…म्हणून मालदीव्हजहून परतल्यानंतर जान्हवी कपूरनं मागितली जाहीर माफी

 पोलीसनामा ऑनलाइन – सध्या अनेक सेलिब्रेटी व्हॅकेशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. आलिया भट, रणबीर कपूर, सारा अली खान, जान्हवी कपूर, टायगर श्रॉफ, दिशा पाटनी असे सगळेजण मालदीवमध्ये आहेत. हे सगळे स्टार्स मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. अनेकजण मालदीवमध्ये सुट्टी घालवून परतले आहेत. नुकतेच जान्हवी कपूरदेखील व्हॅकेशन एन्जॉय करुन परतली आहे. तिच्या या भटकंती दरम्यान जान्हवीला मात्र एका गोष्टीची जाणीव झाली आहे. तिची गोष्ट तिने चाहत्यांसह शेअर करत जाहीर माफी मागितली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर मालदीव्हज व्हॅकेशनमुळे चर्चेत होती. निसर्गाच्या सानिध्यात एन्जॉय करताना दिसली.सोशल मीडियावर तिने भली मोठी पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे.जागतिक वसुंधरा दिवसाचे निमित्त साधत तिने ही पोस्ट केली होती. पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, “ज्या पृथ्वीने आपल्याला भरभरु दिले तिला मात्र आपण फक्त त्रास दिला. नेहमीच आमची काळजी घेतली मात्र आम्ही प्रत्येकवेळी फक्त आणि फक्त बेजबादारपण वागलो, तू वाट बघत राहिलीस पण आम्ही तुझी किंमत केली नाही. या सगळ्यासाठी आम्हाला माफ कर.’ अशी पोस्ट करत तिने या संपूर्ण पृथ्वीची माफी मागितली. अशा आशयाची पोस्ट टाकत तिने मनातली खदखद व्यक्त केली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपलं योगदान देण्याची गरज असल्याचे तिने सांगितले आहे. जान्हवीची पोस्ट वाचून तिचे चाहतेही तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात जान्हवी कपूरला पाहताच एका चाहत्याने जान्हवीसह फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सेल्फी काढण्याआतच जान्हवी कपूरच्या मॅनेजरने असे काही केले की, व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल संताप. जान्हवीसह चाहत्याला सेल्फी हवा होता म्हणून त्याने मोबाइल जान्हवीच्या समोर नेला. मात्र मॅनेजरने काही कळण्याच्या आतच चाहत्याच्या हाताला जोरदार धक्का देत त्याला मागे ढकलले आहे.