अभिनेत्री जान्हवी कपूरला लग्नाआधीच हवंय बाळ ? स्वत:च केला सोशलवर खुलासा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर नेहमीच आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं चर्चेचा हिस्सा बनत असते.

अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो किंवा वर्कआउटचे फोटो आणि काही व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत असतात. एका पोस्टमुळं जान्हवी कपूर चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे तिनं फोटोला दिलेलं विचित्र कॅप्शन आहे.

जान्हवीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं की, इथं तुला पहात आहे बच्चा. ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांना तर काहीच समजलं नाही. चाहते तिला सतत प्रश्न करू लागले.

जान्हवी कपूरला हवंय बाळ ?

जान्हवीच्या पोस्टवर एकानं कमेंट करत विचारलं की, कुणाचं मूल ? तुला बाळ हवं आहे का ? यावर तिनं रिप्लाय करत हो असं उत्तर दिलं आहे. परंतु हा सगळा काय प्रकार आहे ते मात्र कोणालाही समजायला तयार नाही.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्येही ती दिसली होती. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती रूही आफ्जा या सिनेमात राजकुमार रावसोबत काम करताना दिसणार आहे. जान्हवी गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलला गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही काम करणार आहे. तिच्यासोबत पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. याशिवाय तिच्याकडे करण जोहरचा मल्टीस्टारर तख्त हा सिनेमादेखील आहे.

https://www.instagram.com/p/B8S3pJPAKNx/

https://www.instagram.com/p/B6hlF4bgriK/