जान्हवी कपूरला कार्तिक आर्यन नाही तर ‘या’ अभिनेत्याला KISS करण्याची इच्छा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीदेवीची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतात. पुन्हा एकदा जान्हवी कपूर चर्चेत आली आहे. याला खास कारणही आहे. जान्हवीला कोणत्या अभिनेत्याला किस करायला आवडेल याचा खुलासा जान्हवीने केला आहे. एका मुलाखतीत जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांनी हजेरी लावली होती. यावेळी जान्हवी बोलत होती.

View this post on Instagram

Pomegranate constellations ✨

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

या मुलाखतीत जान्हवी आणि खुशी यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अनेक प्रश्नांना त्यांनी मोकळ्यापणाने उत्तरे दिली. यावेळी जान्हवीला विचारण्यात आले की, बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्याला किस करायला आवडेल, कार्तिक आर्यन की विकी कौशल ? या प्रश्नाला उत्तर देताना जान्हवी हसत म्हणाली की, “उरी मधील विकी कौशल याला मला किस करण्याची इच्छा आहे.” जान्हवीने दिलेले हे उत्तर थोडे चकित करणारे आहे.

View this post on Instagram

Tbt to being fit #seeusoon 🤞🏻🤞🏻

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

दरम्यान लवकरच जान्हवी कूपर आणि विकी कौशल करण जोहरच्या आगामि सिनेमात एकत्र दिसणार आहे अशी चर्चा रंगताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करण या शो मध्ये सारा अली खानला कोणत्या अभिनेत्याला डेट करायला आवडेल असे विचारले असता तिने कार्तिक आर्यनचे नाव घेतले होते.

View this post on Instagram

💭🌈

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

You might also like