‘हेवी’वेट लेग वर्कआऊट करताना दिसली जान्हवी कपूर (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर अ‍ॅक्ट्रेस तर आहेच सोबतच ती एक फिटनेस फ्रिक आहे. सध्या तिचा एक वर्कआऊट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओत जान्हवी हेवी वर्कआऊट करताना दिसत आहे. खांद्यावर वजन घेत ती स्क्वॉट्स करताना दिसत आहे.

जान्हवीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लू कलरची शॉर्ट आणि व्हाईट टी शर्ट घातला आहे. जान्हवीनं खांद्यावर हेवी वेट घेतलं आहे आणि ती लेग वर्कआऊट करत आहे. सध्या जान्हवीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनीही तिचं कौतुक केलं आहे. जान्हवी 22 वर्षांची आहे. जान्हवी आपल्या फिटनेसपासून तर ब्युटीपर्यंत आणि अ‍ॅक्टींगपासून तर डान्सपर्यंत सर्व काही मेंटेन ठेवते. चाहत्यांना तिचा डान्स आणि तिची अ‍ॅक्टींगही तितकीच आवडते. सोशलवर तिची मोठी फॅन फॉलविंग आहे.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्येही ती दिसली होती. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची शुटींगही सुरू झाली आहे. याशिवाय ती रुही आफ्जा या रोमँटीक हॉरर सिनेमातही दिसेल. इतकेच नाही तर तर गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलल्या गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही ती काम करणार आहे. याशिवाय तिच्याकडे तख्त हा सिनेमादेखील आहे.

https://www.instagram.com/p/B8S3pJPAKNx/

https://www.instagram.com/p/B9B24byhFzt/