राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरेचं अपघाती निधन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने धडक दिल्याने राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरेचा मृत्यू झाला. ही घटना डोंबिवलीच्या पलवा सिटी सर्कल येथे रविवारी घडली. तिच्या निधनामुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जान्हवीने २०१५ साली राज्य कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकावून खेळाची सुरूवात केली. यानंतर तिने सब-जुनिअर व जुनिअर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत युवा गटात तिने कांस्य पदक पटकाविले होते. सध्या ती सीनियर गटात कामगिरी करत असल्याने तिच्याकडून महाराष्ट्राला खूप अपेक्षा होत्या. जान्हवी पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. रविवारी तिला डंपरने धडक दिली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिला मृत घोषीत केले.

जान्हवीच्या पश्चात आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. डोंबिवलीत तिच्यावर आज अंतिम संस्कार करण्यात आले. नेहमी हसतमुख व मृदुभाषी असलेल्या जान्हवीला अंतिम निरोप देण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड व मुंबईतील अनेक कॅरम खेळाडू व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Loading...
You might also like