पोलीसनामा ऑनलाईन : अभिनेत्री जन्नत जुबेर (Jannat Zubair Rahmani) ही छोट्या पडद्यावरील ‘काशी’, ‘फुलवा’, ‘तू आशिकी’ या अशा मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आली होती. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले होते. जन्नत तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश लुकमुळे देखील ओळखली जाते. जन्नत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे वेगवेगळ्या लूक मधील फोटोज चाहत्यांसाठी शेअर करत असते. जन्नतने अलीकडेच शेअर केलेल्या नव्या फोटोशूटमुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.
यावेळी जन्नतने शेअर केलेल्या फोटो पेक्षा तिच्या मागे असणाऱ्या व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जन्नतने Instagra वर तिचे नवीन लूक मधील फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये जन्नत खूपच कूल दिसत आहे. या फोटोमध्ये जन्नतने जांभळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. यावर तिने बन हेअर स्टाईल करत हॅन्डबॅग कॅरी केले आहे. यावेळी तिने न्यूड गुलाबी रंगाचा मेकअप देखील केला आहे. या लूकमध्ये जन्नत खूपच गोड दिसत आहे. जन्नतच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट देखील केले आहेत.
या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे. मात्र तिच्या या स्टाईल पेक्षा जास्त लोकांचे लक्ष वेधले ते तिच्या
मागे असणाऱ्या व्यक्तीने. ही मागे असणारी व्यक्ती अजून कोणी नसून जन्नतचे वडील आहेत.
जन्नतचे वडील झुबेर अहमद रहमानी यांनी जन्नतच्या फोटो मागे पोज देत तिचे फोटो फनी करण्याचा प्रयत्न
केला आहे. त्यांचे देखील अनेकांनी कौतुक केले आहे. जन्नतच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास तीने अनेक
प्रोजेक्ट सायन केले आहेत. जन्नत काही दिवसांपूर्वी आलेला पंजाबी चित्रपट ‘कुलचे छोले’ मध्ये झळकली होती.
Web Title :- Jannat Zubair Rahmani | actress jannat zubair shared new look in purple outfits see her photos here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update