जनता कर्फ्यू : रितेश देशमुख अणि जेनेलियानं केली सर्वांना ‘ही’ विनंती (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन –  देशासह राज्यभरात मागील काही दिवसांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा कोरानावर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना मुंबई, पुणे आणि अन्य महत्वाच्या शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मोनरंजन श्रेत्रातील कलाकारांनीही या जनता कर्फ्यूला पाठिंबा दिला आहे. अभिनेता सलमान खाननंतर आता रितेश देशमुख व त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा यांनाही ट्विटवरुन एक टिकटॉक व्हिडिओ पोस्ट करत घरातच राहण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे.

रितेशने ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडिओ पोस्ट करीत जनता कर्फ्यूमध्ये भारत कोरोनाशी लढा देत असून नागरिकांनी घरीच थांबा, ठणठणीत राहा, असा संदेश रितेशने दिला आहे. तर जेनेलियाने, भारत करोनाशी लढा देत असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओच्या शेवटी दोघेही चेहर्‍यावर मास्क घालून नमस्कार करत आपल्या चाहत्यांना घरीच राहण्याची विनंती करताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटची राष्ट्रगिताची धून ऐकू येत आहे. यामधून भारतासाठी हे इतके करा असे सांगण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आहे. रितेश आणि जेनेलिया यांच्यासह मराठी अभिनेत्री पर्ण पेठे, स्पृहा जोशी अभिनेत्रींनीही सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून चाहत्यांना घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे.