‘या’ राज्यात 10 ऑगस्टपर्यंत लागू झाला ’जनता कर्फ्यू’, ‘हे’ नियम पाळावे लागणार

पणजी : वृत्त संस्था – देशभरात कोरोना व्हायरसचे संक्रमण वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात कोविड-19 ची सर्वाधिक 29,429 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर देशात या घातक व्हायरसने आतापर्यंत संक्रमित झालेल्या लोकांची एकुण संख्या वाढून 9,36,181 झाली आहे. यामुळे विविध राज्य सरकारे संसर्ग रोखण्यासाठी अनेक पावले उचलत आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवार सांगितले की, 10 ऑगस्टपर्यंत राज्यात जनता कर्फ्यू लावला जाईल. जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय कोरोनाची वाढते प्रकरणे रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. याशिवाय गोव्यात या आठवड्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी लागोपाठ 3 दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाऊन राहील.

जनता कर्फ्यूमध्ये रात्री 8 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत कुणालाही घराच्या बाहेर पडण्याची परवानगी नाही. मात्र, मेडिकल सुविधांशी संबंधित लोक एक ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊ शकतात.