जापानमध्ये झाला Naked Festival, कडाक्याच्या थंडीत कपड्यांविना धावले लोक

टोकियो : वृत्तसंस्था – जापानमधील होन्शु बेटावर शनिवारी एक असा कार्यक्रम झाला, ज्याबाबत जाणून घेतल्यास कुणालाही आश्चर्य वाटेल. या बेटावर एक नेकेड फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. यामध्ये भाग घेण्यासाठी जगभरातूनही लोक आले होते. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार या इव्हेंटचे नाव Hadaka Matsuri आहे.

हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी सायदायजी कन्नोनिन मंदिरात आयोजित केला जातो. या कार्यक्रमात पुरुष कमीतकमी कपड्यांमध्ये आले. बहुतांश पुरूषांनी जापानी लंगोट घातले होते.

या गेममधून बाहेर येता-येता जखमी होतात लोक
हा एक शेतातील पिकाच्या संदर्भातील उत्सव आहे. तरूण पीढीमध्ये शेती आणि शेतकरी यांच्याबाबत आवड निर्माण करणे, हा यामागील उद्देश आहे. या कार्यक्रमात पुरुष मंदिराच्या चारही बाजूने धावतात आणि स्वताला थंड पाण्याने शुद्ध करतात. यानंतर ते मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जातात. नंतर सर्वांना दोन लकी स्टीक शोधाव्या लागतात, ज्या मंदिराचे पुजारी 100 अन्य बंडल्ससोबत फेकतात. या स्टिक्स शोधण्याच्या दरम्यान अनेकजण जखमी होतात, तसेच गेममधून बाहेर पडता-पडता जखमी होतात. या कार्यक्रमाशी संबंधित एका प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही ही परंपरा पुढेही सुरू ठेऊ. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जपानच्या नागरिकांसह जगभरातून लोक येतात.