‘या’ देशात लग्न केल्यावर सरकार देणार 4.20 लाख रुपये, ‘हे’ आहेत नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एक देश असाही आहे, जिथे तुम्ही लग्न केल्यास सरकारकडून तुम्हाला ४.२० लाख रुपये मिळतील. हे रुपये यासाठी दिले जातील, जेणेकरून तुम्ही तुमचे नवीन विवाहित जीवन अधिक चांगल्या प्रकारे सुरू करू शकाल. या देशातील सरकारने अलीकडेच ही घोषणा केली आहे की, तुम्ही लग्नासाठी या योजनेत आपले नाव नोंदवा आणि पात्रतेनुसार पैसे घेऊन जा.

या देशाचे नाव आहे जपान. येथील सरकार त्या लोकांना पैसे देईल, जे पैशाच्या अभावामुळे लग्न करू शकत नाहीत. कारण या देशात जन्मदर चिंतेचा विषय आहे. येथे नवविवाहितांना त्यांचे जीवन सुरू करण्यासाठी सुमारे ४.२ लाख रुपये दिले जातील. यासाठी त्यांना जपानच्या नवविवाहित सहाय्य कार्यक्रमात सामील व्हावे लागेल. ही मदत योजना पुढच्या वर्षी एप्रिलपासून सुरू होईल.

वास्तविक जर लोकांनी उशीरा लग्न केले किंवा अविवाहित राहिले, तर त्याचा परिणाम देशाच्या जन्मदरावर होतो. हे निश्चित करण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. जपान सरकारच्या कॅबिनेट कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील विवाह वाढवण्यासाठी सरकार ही योजना चालवेल. अधिकाधिक जोडप्यांना आर्थिक सहाय्य करेल.

पती आणि पत्नीचे वय लग्नाच्या नोंदणीकृत तारखेनुसार ४० वर्षांपेक्षा कमी असावे. एकूण उत्पन्न ३८ लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे. तेच या मदत कार्यक्रमासाठी पात्र असतील. ३५ वर्षे वय असलेल्यांसाठी नियम थोडे वेगळे आहेत. जर त्यांचे उत्पन्न ३३ लाख रुपये असेल, तर त्यांना सुमारे २.१ लाख रुपये दिले जातील.

हा कार्यक्रम कमी जन्मदर लक्षात घेता सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. एका विवाहित जोडप्याला दोन मुले असतात . मात्र गेल्या वर्षी एका महिलेच्या आयुष्यात मुले जन्माला घालण्याची सरासरी संख्या १.३६ होती. २०१९ मध्ये ८६५,००० मुले जन्माला आली. जी रेकॉर्डनुसार कमी संख्या आहे.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन आणि सोसायटी सिक्युरिटी रिसर्चच्या एका सर्वेक्षणानुसार, २०१५ मध्ये २९.१ टक्के पुरुष आणि १७.८ टक्के महिला ज्यांचे वय २५ ते ३४ दरम्यान आहे, पैशांच्या अभावामुळे लग्न करू शकले नाहीत.