आता जपानने सुद्धा ‘ड्रॅगन’ला दिला झटका, भारतात येणार्‍या कंपन्यांना देणार ‘सबसिडी’ !

नवी दिल्ली : कोरोना महामारी दम्यान आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी जपान आता भारत आणि बांगलादेशकडे महामारीतून उभी राहणारी एक मोठी बाजारपेठ म्हणून पहात आहे. याच पार्श्वभूमीवर जपानने चीनमधून भारतात शिफ्ट होणार्‍या जपानी कंपन्याना प्रात्सोहन दिले आहे. जपान याबाबतीत चीनवरील अवलंबत्व कमी करत आहे.

निक्कीच्या रिपोर्टनुसार, सबसिडी कार्यक्रमाच्या कक्षेत विस्तार करणार्‍या जपानचे लक्ष्य एका विशेष क्षेत्रावरील आपले अवलंबत्व कमी करणे आणि एक अशी प्रणाली विकसित करणे आहे, जे आपत्कालीन वैद्यकीय साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची एक ठोस मागणी करू शकतील.

जपान सरकारने आशिया क्षेत्रात आपल्या निर्मार्ती क्षेत्राचे जाळे पसरवण्यासाठी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी म्हणून 2020 बजेटमध्ये 23.5 बिलियन येनचे वाटप केले आहे. 3 सप्टेंबरला सुरू झालेल्या आशिया-जपान पुरवठा साखळीमध्ये लवचिकता आणत योजनेसाठी स्थलांतर यादीत भारत आणि बांगलादेशला सुद्धा सहभागी केले आहे.

अनेक अरब येनची सबसिडी देणार जपान
निक्कीचे म्हणणे आहे की, चीनमधून आपल्या कंपन्या भारतात स्थलांतरित करणार्‍या जपानी कंपन्यांना सबसिडी म्हणून जपाकडून मिळणारी मदत रक्कम अनेक अरब येनमध्ये आहे. सध्या जपानी कंपन्यांची पुरवठा साखळी बहुतांश चीनवर अवलंबून आहे. परंतु, कोरोना महामारीदरम्यान पुरवठ्यात कपात करण्यात आली होती.