Coronavirus : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘जपान’मध्ये टोकियो, ओसाकासहइतर 6 प्रांतात ‘आणीबाणी’ घोषित

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जगात कोरोनामुळे भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील 200 पेक्षा जास्त देशात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. या दरम्यान भारतात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. परंतु तो लॉकडाऊन उठवणार की नाही यावर अद्याप चर्चा सुरु आहे. अशात आता जपानमध्ये कोरोनाच्या सावटापासून वाचण्यासाठी खबरदारी म्हणून टोकियो, ओसाका सह 5 प्रांतात राज्य आपत्काल घोषित करण्यात आला आहे.

वृत्तानुसार, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी जपानमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही घोषणा केली. जपानच्या टोकियो, ओसाकोसह कानागवा, सायतमा, चीबा, होयगो आणि फुकाओको या प्रांतात राज्य आपत्काल घोषित करण्यात आला आहे.

जपानचे पंतप्रधान म्हणाले की, एक महिन्याच्या कालावधीसाठी राहील असा अंदाज आहे. आपत्कालीन घोषणेची ही स्थिती वैद्यकीय सेवा प्रणाली अबाधित राहील हे सुनिश्चित करणे आणि शक्य तितके संक्रमण कमी करण्यासाठी एकमेकांशी संपर्क टाळण्यासाठी यासाठी आहे, जनतेकडून आणखी सहकार्याची विनंती यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली.

ज्या सात प्रांतात आपत्काल घोषित करण्यात आला आहे त्या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आधिक आहे. वृत्तानुसार जपानमध्ये टोकियोत देखील कोरोनाचे रुग्ण आधिक आहेत. तेथे सोमवारी 83 नवे रुग्ण आढळले. शनिवारी येथे 117 तर रविवारी 143 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. रविवारी वाढलेल्या आकडेवारीनुसार ही आतापर्यंतची सर्वात आधिक एक दिवसीय आकडेवारी होती ज्या दिवशी कोरोनाचे आधिक नवे रुग्ण आढळले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like