पंतप्रधान नरेंद्र मोदींना twitter वर ‘फाॅलो’ करणारे जपानचे पंतप्रधान शिंजो अबे भारत दौर्‍यावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जपानचे पंतप्रधान शिंजो अबे या वर्षी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी शिंजो आबे यांच्या भारत दौऱ्याची माहिती दिली. जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे नूतन परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना फोन करून या दौऱ्याची माहिती दिली तसेच जपानला येण्याचे आमंत्रणही दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात जपानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ओसाका येथे २८ ते २९ जूनच्या दरम्यान होणाऱ्या जी २० शिखर संमेलनात भाग घेणार आहेत. या संमेलनात जपानमधील मोठ्या नेत्यांची उपस्थिती असेल.

दरम्यान, मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात भारत आणि जपानचे संबंध चांगले राहिले आहेत. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये व्यक्तिगत पातळीवर चांगले संबंध राहिले आहेत. याचा थेट परिणाम दोन्ही देशाच्या राजनैतिक संबंधावर झाल्याचे दिसून आले. सध्या, जपान बुलेट ट्रेनसह अनेक योजनांमध्ये भारताला मदत करत आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत आणि जपान यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील.