Video : G-20 परिषद : PM मोदी – ट्रम्प यांची भेट ! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, भारत आणि अमेरिका चांगले ‘मित्र’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जपानच्या ओसाकामध्ये सुरू असलेल्या जी-२० परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी यांच्या कामाचे कौतुक केले. त्याचबरोबर ऐतिहासिक विजयाबद्दल मोदींचे अभिनंदन केले. त्याचबरोबर त्यांनी मोदींच्या क्षमतांचे देखील कौतुक केले. त्याचबरोबर मोदींनी या परिषदेत जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्याशी देखील चर्चा केली. त्याचबरोबर भारत आणि अमेरिका यांच्या संबंधाविषयी बोलताना ट्रम्प म्हणाले कि, भारत आणि अमेरिका यांच्या मैत्रीला नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात या पाच विषयावर झाली चर्चा

१) सर्वात पहिले डोनाल्ड ट्रम्प यांनी लोकसभेतील विजयाबद्दल नरेंद्र मोदींचे आभार मानले. मोदींना शुभेच्छा देताना ते म्हणाले कि, तुम्ही उत्तम काम केले आहे. ट्रम्प याच्या या अनपेक्षित कृतीचे सर्वांनाच आश्चर्य वाटले.

२) त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा निवडणूक जिंकलात, तेव्हा अनेक गट आपापसात लढत होते. मात्र आता ते एकत्र आले आहेत. यातून तुमची अद्भुत क्षमता दिसते, अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक केलं.

३) त्यानंतर ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक करताना म्हटले कि, भारतातील सर्व गट एक करत त्यांनी भारताच्या विकासात हातभार लावला आहे. प्राचीन काळापासून भारतात असलेली हि प्रथा मोदींनी नष्ट करून देशाच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे.

४) लोकशाही आणि शांततेसाठी कटिबद्ध असल्याचं मोदी म्हणाले. ‘सबका साथ, सबका विकास हा आमचा मंत्र आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आम्ही पुढे जात आहोत,’ असं मोदींनी ट्रम्प यांना सांगितलं.

५)त्यानंतर भारत आणि अमेरिकेच्या संबंधावर बोलताना ट्रम्प म्हणाले गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि अमेरिकेचे संबंध सुधारले आहेत . भारत आणि अमेरिकेची मैत्री नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून मोदी माझे चांगले मित्र असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं.

आरोग्यविषयक वृत्त

चणे खा आणि ‘या’ गंभीर आजारांवर नियंत्रण मिळवा

आहारातील ‘तंतुमय पदार्थ’ करतात ‘हृदयरोगां’पासून बचाव

नियमित भात खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे

‘हात थरथरणे’ सामान्य समस्या नाही, कारण…

‘या’ पद्धतीने चहा पिणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या

सिनेजगत

Video : BF सोबत ‘एन्जॉय’ करतेय अभिनेता आमिर खानची मुलगी इरा, पहा तिचा ‘भन्‍नाट’ डान्स

Video : अभिनेत्री करिना कपूरच्या ‘या’ बोल्ड व्हिडीओने वाढवलं इंटरनेटच ‘तापमान’