Video : G-20 जपानमध्ये नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर ‘जय श्रीराम’चे नारे !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदी हे गुरुवारी जपानमध्ये सुरु असलेल्या जी – 20 समिटमध्ये सहभागी झाले. त्याआधी त्यांनी भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित केले. जेव्हा मोदीचे भाषण संपन्न झाले त्यांनंतर उपस्थित लोकांनी ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’ हे नारे देण्यास सुरुवात केली.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हणाले की, न्यू इंडियाची आशा आणि आकांक्षा पुर्ण करणारा मिळालेला जनादेश सर्व जगातील आपले संबंधाना नवी ऊर्जा देईल. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या ज्या मंत्राने आपण चालत आहोत त्यांने भारताबद्दल जगाभरातील देशांचा अधिक विश्वास आपल्यावर निर्माण होईल. जेव्हा जगाबरोबर आपला संबंधांचा विचार येतो तेव्हा जपानचे त्यात महत्वाचे स्थान असते. हे संबंध आज नाही तर अनेक वर्षांपासून आहे. त्याच्यात मुळात आत्मीयता, सद्भावना आहे. एक दुसऱ्यांच्या संस्कृति आणि सभ्यतेचा सन्मान आहे.

‘सेवा’ भारताला जपानशी जोडणारा धागा –

जपानच्या लोकांबरोबर असलेल्या संबंधावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की आपल्या बोलचालीत देखील एक धागा आहे, ज्याला भारतात ध्यान म्हणण्यात येते, जपानमध्ये त्यांना जेन म्हणण्यात येते. तर ज्या प्रकारे भारतात सेवा म्हणण्यात येते तसेच जपानमध्ये देखील सेवा म्हणण्यात येते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज भारताचा असा कोणताही भाग नाही जेथे जपानच्या प्रकल्पांनी गुंतवणूक करुन आपली छाप सोडली आहे. तसेच भारताचे टॅलेन्ट आणि मॅनपॉवर जपानला मजबूत करण्यात योगदान देत आहे. पंतप्रधान शिॆजो आबे माझ्या मतदार संघात आणि जगातील सर्वात जुनी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नगरी असलेल्या काशी मध्ये गंगा नदीच्या आरतीत सहभागी झाले होते, तेव्हाचे त्यांचे फोटो आज देखील भारतीयांच्या मनात आहेत.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या भारत आणि जपानच्या केलेल्या संबंधावरील भाषणानंतर उपस्थित जापानमधील भारतीयांना त्यांच्या भाषणावर जोरदार टाळ्यावाजून प्रतिसाद तर दिलाच पण यावर न थांबतात, मोदीच्या भाषणानंतर ‘जय श्री राम’चे नारे लावण्यात आले, याशिवाय ‘भारत माता की जय’चे नारे देखील देण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त

‘हे’ आहेत शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होण्याचे संकेत

तणावग्रस्त महिलांना मासिक पाळीत होतो जास्त त्रास

दातांचे आरोग्य राखण्यासाठी ‘ही’ माहिती आहे खूप आवश्यक

तणावामुळे जुनी दुखणी होतात अधिक गुंतागुतीची

सिनेजगत

‘कबीर सिंह’चं वादळ थांबता थांबेना ! आठवडयाभरात ‘या’ मोठया अभिनेत्यांच्या सिनेमांना टाकलं मागे

First Look : अभिनेता विक्‍की कौशल बनला फिल्ड मार्शल ‘सॅम मानेकशॉ’ !

‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या पत्नीला होतं अश्‍लील व्हिडीओ पाहण्याच ‘व्यसन’