Coronavirus : जापानच्या ‘या’ औषधामुळं फक्त 4 दिवसात ठीक होतोय ‘कोरोना’चा रूग्ण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या २ लाखाहून अधिक झाली आहे. शास्त्रज्ञांच्या मते कोरोना लस तयार होण्यास आणखी काही महिने लागू शकतात. दुसरीकडे चीनने असा दावा केला आहे की जपानमधील एक औषध कोरोनाच्या रूग्णांच्या उपचारासाठी खूप उपयुक्त ठरत आहे.

एका वृत्तानुसार, चीनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयात काम करणारे झांग झिनमिन यांनी म्हटले आहे की, जपानमधील लोक सामान्य फ्लूच्या उपचारांसाठी वापरत असलेले औषध कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे औषध फ्यूजीफिल्मची औषध कंपनी फेवीपिराविर (favipiravir) नावाचे औषध तयार करते. वुहानच्या शेन्झेनमध्ये या औषधाच्या वापरामुळे कोरोनाचे ३४० हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. झांग यांच्या मते, बाकीच्या औषधांपेक्षा हे औषध अधिक प्रभावी सिद्ध झाले आहे याचा ठाम पुरावा आहे.

त्वरीत करते विषाणूवर मात
जेव्हा कोरोना विषाणूने पॉझिटिव्ह रूग्णांना हे औषध देण्यात आले तेव्हा ते फक्त चार दिवसांनी निगेटिव्ह दिसून आले. सध्या वापरली जाणारी उर्वरित औषधे प्रभावी होण्यासाठी ११ दिवस घेत आहेत. या औषधाच्या वापरामुळे फुफ्फुसांवर होणारा कोरोनाचा परिणाम ९१% पर्यंत त्वरीत बरा होत आहे, तर इतर औषधांमध्ये ही टक्केवारी केवळ ६२% आहे.

फ्यूजीफिल्म टोयामा केमिकल ही जपानी कंपनी हे औषध तयार करते, यास अवीगन असेही म्हणतात. झांग म्हणाले की जपानमधील वैज्ञानिकही कोरोनाचा इलाज शोधण्यासाठी या औषधाचा उपयोग करीत आहेत. तथापि, जपानचे म्हणणे आहे की या औषधाचा गंभीर कोरोना रूग्णांमध्ये सामान्य रुग्णांसारखा प्रभाव पडत नाही.

एचआयव्ही (HIV) च्या औषधाने देखील चांगले निकाल
यापूर्वी एचआयव्हीवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या लोपीनावीर आणि रिटोनावीर हे औषध खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले होते. सन २०१६ मध्ये जपानने इबोलाच्या उपचारासाठी देखील हेच फेवीपिराविर औषध वापरले. तसेच या औषधास इतर देशांत उपचारांसाठी देखील पाठविण्यात आले होते. फेवीपिराविरचा उपयोग सामान्य फ्लूवर उपचार करण्यासाठी केला जातो, सध्या त्याच्या कोरोनासंदर्भात क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत.