पायांचे विशिष्ट पॉइंट दाबल्याने दूर होतात अनेक समस्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दिर्घकाळ एखादा आजार राहिला तर तो नंतर गंभीर होऊ शकतो. ही समस्या दूर करण्यासाठी जपानमध्ये अ‍ॅक्यूप्रेशर पॉइंट्सचा केला जातो. या पॉइंट्सचे कनेक्शन बॉडीच्या विविध भागांशी असते. पायाच्या तळव्याचे हे पॉइंटस रोज १० ते १५ मिनिटे दाबले तर अनेक प्रकारचे आजार दूर होतात. या जापानी पध्दतींविषयी माहिती घेतल्यास आपण विविध आजारांवर नियंत्रण मिळवू शकतो.

दोन्ही पायांचे विशिष्ट पॉइंट दाबल्याने डोकेदुखी दूर होते. यासोबतच ब्रेन फंक्शन्स सुधारतात. पायाचे काही पॉइंट रोज दाबल्याने हार्ट रेट सुधारतात. यामुळे हार्ट डिसिजचा धोका कमी होतो.

 अ‍ॅक्युप्रेशरने कोणते आजार बरे होतात
इनडायजेशन, बध्दकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते

डोळ्यांचा थकवा दूर होतो. दृष्टी वाढवण्यात मदत होते

आतड्यांशी जोडलेले पॉइंट दाबल्याने बध्दकोष्ठता नियंत्रित होते

लोवर बॅक पेनची समस्या दूर होते