Weight Loss : जपानचे लोक ‘या’ ट्रिकने कमी करतात वजन, पुन्हा कधीही वाढत नाही ‘लठ्ठपणा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एका सोप्या आणि गुणकारी जपानी फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही लठ्ठपणापासून मुक्त होऊ शकता. यासाठी तुम्हाला दिवसाची सुरुवात गरम पाण्यासोबत केळे खाऊन करावी लागेल. जपानचे अनेक लोक आपल्या सकाळच्या नाश्त्यात हे डाएट फॉलो करतात. यास असा डाएट म्हटले जाते. याबाबत जाणून घेवूयात…

या कारणामुळे वाढत नाही वजन –
केळे मेटाबॉलिज्म सिस्टम सुधारण्यात मदत करते, तसेच पचनक्रिया मजबूत करते. यामध्ये स्टार्चसुद्धा भरपूर असते, ज्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सची मात्रा खुप कमी असते. केळ्यातील फायबर पोटात बद्धकोष्ठता होऊ देत नाही आणि मनाच्या संतुष्टीसह कार्बोहायड्रेटचे अतिरिक्त शोषण रोखते.

भूक कमी करण्यासाठी उपयोगी –
स्टार्च आणि हेल्दी कार्बोहायड्रेटयुक्त हा डाएट लठ्ठपणा कमी करतो. यामुळे उशीरापर्यंत पोट भरल्यासारखे राहते. यामुळे भूक कमी लागते.

कसे कराल सेवन –
सकाळी उठताच एक ग्लास कोमट पाणी प्यावे. नंतर अर्ध्या तासाने 2 केळी खावीत, तुम्ही तुमच्या भूकेच्या मात्रेनुसार केळ्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता.

1. डाळिंब –
दररोज एक डाळिंब खाऊन तुमचे वजन कमी होऊ शकते शिवाय कमजोरी सुद्धा दूर होते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी लाभदायक आहे.

2. सफरचंद –
लाल सफरचंदमध्ये भरपूर फायबर्स असल्याने पचनशक्ती वाढते, भूक नियंत्रित होते.

3. आलू बुखारा –
हे सवेन केल्याने वजन कमी होते. इम्यून सिस्टम मजबूत होते. दिवसभरासाठी ऊर्जा मिळते.

4. चेरी –
वजन कमी करण्यासाठी चेरी खाणे एक चांगला उपाय आहे. रिकाम्यापोटी खाणे लाभदायक ठरते.

5. स्ट्रॉबेरी –
रोज पाच-सहा स्ट्रॉबेरी खाण्याने वजन कमी होते, इम्यून सिस्टम मजबूत होते, त्वचा सुंदर आणि तरूण होते.