Ex GF वर ‘वॉच’ ठेवण्यासाठी खोदला खड्डा आणि…. ‘झाले असे’

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – सध्या गलफ्रेंड असणं किंव्हा बॉयफ्रेंड असणं हे कॉमन झाले आहे. याऊलट त्यांना गलफ्रेंड किंव्हा बॉयफ्रेंड नसेल तर लगेच त्यांचेच मित्र-मैत्रिणी त्यांच्याकडे डोळे मोठे करुन पाहतात. आपण पाहिले तर जास्तीत जास्त मुलींचे पुर्ण लक्ष आपल्या बॉयफ्रेंड कडे असते. जसे की तो कुठे जातो, त्याचा व्हॉट्सॲप चे लास्टसिन पाहिले जाते. किंवा त्याचा मोबाईल चेक केला जातो. जर चुकुन झाला ब्रेकअप तर एकमेकांना विसरुन जातात. आजकाल हे चालते. पण आत्ता जे घडले आहे ते एकदम विचित्र आणि धक्कादायक व उलटे घडले आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

उत्तर मेक्सिकोमध्ये चक्क एका बॉयफ्रेंड ने आपल्या एक्स गलफ्रेंड वर पारख ठेवण्यासाठी तिच्या घरापर्यंत भुयारी मार्ग केला आहे. आणि भुयारी मार्ग खोदला आणि अडकला तोच ते कसे ? झाले असे की, एका वृत्तसमुहाने माहिती दिल्यानुसार त्या महिलेने सांगितले की, सुरुवातीला मला वाटले की हा आवाज मांजरीचा आहे. पण स्नॅचिंगचा आवाज दिवसेंदिवस वाढत होता. आणि तो ही घराच्या खालून जेव्हा शोध घेण्यात आला तेव्हा ज्याने हा भुयारी मार्ग खोदला होता. तोच यामध्ये अडकला होता. त्याला कसेबसे वाचविण्यात आले.

दोघांचे रिलेशन १४ वर्षांसापून होते, मात्र नंतर दोघे वेगळे झाले. पोलिसांनी आधीच या एक्स गलफ्रेंड पासून वेगळे राहण्यास सांगितले होते. पण त्याने लक्ष दिले नाही. त्यांच्यावर महिलेने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला आहे. त्याला जेव्हा भुयारीतून बाहेर काढण्यात आले तेव्हा पोलिसांच्या माहितीनुसार त्याची परिस्थिती चांगली नव्हती. पण त्याच्यासाठी जीव वाचला हे महत्वाचे.

You might also like