Jarandeshwar Sugar Factory case | जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jarandeshwar Sugar Factory case | प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) बेनामी संपत्ती जमा केल्याचा ठपका ठेवत 65 कोटी रुपये किंमतीचा खरेदी झालेला जरंडेश्वर साखर कारखान्यासह (Jarandeshwar Sugar Factory case) त्याची जमीन, इमारत आणि इन्फास्ट्रक्चरची प्रतिकात्मक केलेली जप्ती सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानंतर मुंबई आयकर विभागाने ही जप्ती हटवली आहे. गुरु कॉमोडिटी प्रायव्हेट लि. (Guru Commodity Private Limited) कंपनीच्या माध्यमातून खरेदी केलेल्या मालमत्तेवर जप्तीचे आदेश मागे घेतले आहेत. तसचेच कोरेगाव तालुक्यातील चमणगाव गोटा या गावामध्ये जरंडेश्वर मालमत्तेवरची जप्तीचे आदेश देखील मागे घेतले आहेत.

 

जरंडेश्वर साखर कारखान्याच्या (Jarandeshwar Sugar Factory case) खरेदीवरुन आरोप करण्यात आले होते. त्यामुळे या संदर्भातील संपत्ती जप्त केली होती. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Former BJP MP Kirit Somaiya) यांनी याबाबत तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनंतर आयकर विभागाने कारवाई केली होती.

 

जरंडेश्वरचा व्यवहार 2010 मध्ये झाला होता. 2016 पूर्वी जमीन खरेदी करण्यात आलेली होती.
2010-11 मध्ये कारखान्याचे नुतनीकरण करुन उभारणी करण्यात आली आहे.
तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या ऑगस्ट 2022 मधील निर्णयानुसार आमच्यावर जप्तीची ही कारवाई होऊ शकत नाही.
त्यावर नोव्हेंबर 2022 मध्ये सुनावणी झाली. अखेर बेनामी कायद्यांतर्गत ज्यांच्याकडे हे अपील करण्यात आले होते,
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2016 पूर्वीची जमीन आणि कारखाना असल्यामुळे प्रतिकात्मक जप्त केलेली
जरंडेश्वर कारखान्याची काही जमीन व मालमत्तावरील जप्ती तात्पुरती रद्द केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Web Title :- Jarandeshwar Sugar Factory case | supreme court gives big relief to ajit pawar in jarandeshwar sugar factory case

   

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Milk Tea Side Effects | पिऊ नये दुधाचा चहा, शरीरात निर्माण होऊ शकतात या ७ गंभीर समस्या

Pune Pimpri Crime | पेट्रोलपंपचालकाची तब्बल 21 लाखांची फसवणूक, पिंपरी चिंचवड परिसरातील घटना

Health Tips | निरोगी शरीरासाठी रोज करा या फूडचे सेवन, वेट लॉस आणि इम्युनिटी वाढण्यासह होतील हे ७ मोठे फायदे