ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आदित्य पांचोली यांची पत्नी जरीना वहाब पुन्हा एकदा आपल्या पतीचा बचाव करण्यासाठी सरसावल्या आहेत. जरीनाने आदित्यवर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. जरीना म्हणतात की, “मी त्यांना बाकी लोकांपेक्षा चांगलं ओळखते. त्यांनी कधीच माझ्यापासून काही लपवलं नाही. कोणी एखाद्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप तेव्हा कसंकाय करू शकते जेव्हा ती व्यक्ती त्याच्यासोबत मोठ्या कालावधीसाठी रिलेशनशिपमध्ये राहिली असेल.”

आदित्यने काहीही चुकीचं केलेलं नाही’

एका मुलाखतीत बोलताना जरीनाने आदित्यवर लावलेल्या आरोपांबाबत भाष्य केलं. जरीना म्हणाल्या की, “जर एखाद्याचं रिलेशन संपलं आहे आणि तो त्याच्या आयुष्यात जर पुढे निघून गेला आहे. तर तुम्ही लगेच त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावणार का ?” असा सवाल जरीना यांनी उपस्थित केला. पुढे त्या म्हणतात की, “मी त्यांना चांगलंच ओळखते. मला माहीत आहे काय झालं होतं ते आदित्यने काहीही चुकीचं केलेलं नाही.”

‘मग तिला मुलीसारखी कशी म्हणू’ ?

याशिवाय एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत जरीना म्हणाल्या होत्या की, “ती (कंगना) माझ्या पतीला साडे चार वर्षांपासून डेट करत होती. मग मी कसं म्हणू की, ती माझ्या मुलीसारखी आहे?”

काय आहे नेमकं प्रकरण ?

तुम्हाला सांगू इच्छितो की, 2017 मध्ये सिमरनच्या प्रमोशनदरम्यान आदित्य पांचोली यांच्यावर शोषण केल्याचे आरोप केले होते. कंगनाने सांगितले होते की, तिने जरीनाकडेही मदत मागितली होती. परंतु त्यांनी तिची मदत केली नव्हती. कंगनाने मुंबई वर्सोवा पोलिसांना ईमेल केला होता. ज्यात 13 वर्षांपूर्वी तिला झालेली मारहाण शोषण केल्याचा उल्लेख होता.

तर दुसरीकडे आदित्य पांचोली यांनी कंगनाविरुद्ध मानहानीची केस दाखल केली होती. यावर बोलताना आदित्य म्हणाले होते की, “कंगनाचे हे माझ्याविरुद्ध षडयंत्र आहे. जेव्हा वर्सोवा पोलीस नोटीस घेऊन माझ्या घरी आले होते तेव्हा मी तर चकितच झालो होतो.”

सिने जगत –

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

#Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीला टायगर श्रॉफने दिलं ‘हे’ बर्थडे ‘गिफ्ट’

#Video : ‘नौटंकी’बाज राखी सावंतकडून ‘वाढीव’ व्हिडिओ शेअर, भडकलेल्या युजर्सने केलं ‘ट्रोल’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like