गर्भश्रीमंत महिलांच्या जुगार अड्ड्याचा ‘पर्दाफाश’ ; पोलिसांकडून चौघींना बेड्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात जुगार अड्ड्यांवर नेहमी पोलिसांकडून छापे घातले जातात. परंतु या छाप्यांमध्ये नेहमी पुरुषांचा जुगार अड्डा असतो. परंतु राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्यांचे होम टाऊन असणाऱ्या नागपूरात मात्र पोलिसांनी छापा टाकून चक्क गर्भश्रीमंत महिलांच्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ गर्भश्रीमंत महिलांना बेड्या ठोकल्या आहेत.

४ गर्भश्रीमंत महिलांना रंगेहात पकडले

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोटीया चौकातील एका इमारतीमध्ये पोलिसांनी छापा टाकला. यावेळी येथे जुगार खेळणाऱ्या ४ महिलांना रंगेहात पकडत पोलिसांनी ३० हजार रुपयांची रोकड जप्त केली.

खिडकीतून पळाल्या दोन महिला

तोटीया चौकातील एका इमारतीमध्ये महिलांचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या इमारतीत छापा टाकला आणि चार महिलांना जुगार खेळताना रंगेहात पकडले. परंतु २ महिलांनी खिडकीतून पलायन केले.

महिलांच्या जुगार अड्ड्याचा पहिल्यांदाच पर्दाफाश

नागपूर शहरात एका उच्चभ्रू इमारतीमध्ये मागील अनेक दिवसांपासून महिलांचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यामुळेच पोलिसांनी छापा टाकून याचा पर्दाफाश केला. महिलांच्या जुगार अड्ड्याचा पर्दाफश पोलिसांनी नागपूरात पहिल्यांदाच केला आहे.

Loading...
You might also like