जसबीरकौर मोहनसिंग राजपाल यांचे अल्पशा आजाराने निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रास्ता पेठमध्ये राहणाऱ्या जसबीरकौर मोहनसिंग राजपाल यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे पती, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कार समयी खासदार वंदना चव्हाण, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, रविंद्र माळवदकर, नगरसेवक विशाल धनवडे, नगरसेवक योगेश समेळ, माजी नगरसेवक निलेश निकम, पुणे महापालिकेचे मुख्य लेखापाल अंबरीश गालिंदे, विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल, भोलासिंग अरोरा, संतसिंग मोखा, हरमिंदरसिंग घई, संतोकसिंग राजपाल, बलबीरसिंग होरा, चंद्रकांत निरगुडकर, संजय नेवासकर, ऍड संजय मांढरे, ऍड म. वि. अकोलकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड श्रीकांत अगस्ते व सर्व पक्षीय व संघटनांचे कार्यकर्ते व शीख समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/