चक्क मॉलमध्ये झाडू मारताना दिसली जसलीन मथारू (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस सीजन १२ मध्ये जसलीन मथारूने आपल्या ग्लॅमरसने सगळ्याना घायाळ केले होते. ती भजन सम्राट अनूप जलोटासोबतच्या नात्यामुळे देखील खूप चर्चेमध्ये आली होती. नेहमी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणाऱ्या जसलीनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती मॉलमध्ये झाडू मारताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये जसलीन मथारू एका मॉलमध्ये आहे आणि ती झाडू खरेदी करत आहे. पण ती एका स्मार्ट ग्राहकासारखे सामान घेताना वस्तूची चौकशी करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये जसलीनच्या हातात दोन झाडू आहे. ती दोन्ही झाडूने फर्शी साफ करताना दिसत आहे. दोन्ही झाडू तपासून ती विचार करते की यामधील कोणता झाडू खरेदी करु?

हा व्हिडिओ शेअर करताना जसलीन मथारूने असे कॅप्शन लिहिले आहे की, ‘कुणीतरी माझ्याकडून स्वीप करायला शिकले पाहिजे.’ याआधी ही जसलीन मथारू बिग बॉसमध्येही घरकाम करताना दिसली आहे. डस्टिंग ड्युटी दरम्यान जसलीन सफाई करायची तेव्हा झाडू व्यवस्थित न ठेवल्याबद्दल घरातील लोक तिची चेष्टा करायचे.

जसलीन मथारूने तिचे मार्गदर्शक अनुप जलोटासोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. शोच्या प्रीमियरच्या दिवशी जसलीनने खुलासा केला की ती आणि अनूप जलोटा रिलेशनशिपमध्ये आहेत. या गोष्टीने सर्वांना चकित केले. एका रात्रीत अनूप जलोटा आणि जसलीन मथारूने सोशल मीडियावर खळबळ उडविली पण बिग बॉसमधून बाहेर पडताच हे दोघेही बदलले. दोघांनीही सांगितले की, रिलेशनशिपमध्ये असणे म्हणजे नाटक आणि बनावट होते.

Visit : Policenama.com