काय सांगता ! होय, ‘भजन’ सम्राट अनुप जलोटाच करणार गर्लफ्रेन्डचं ‘कन्यादान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जसलीन माथारू आणि अनुप जलोटा यांच्या नात्याला जसलीन चे वडील केसर मथारू यांनीही नाकारलं होत. हे सर्व बनावट असल्याचा दावा केसर मथारू यांनी त्या वेळी केला होता.

बिग बॉस सिझन 12 मध्ये सर्वात जास्त वादग्रस्त ठरलेले 65 वर्षीय भजन सम्राट अनुप जलोटा आणि त्यांची 28 वर्षीय गर्लफ्रेंड जसलीन माथारू हे मागील 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. हे जोडपं बिग बॉस च्या स्टेजवर आलं तेव्हा रसिकांसह अभिनेता सलमान खानला ही धक्का बसला होता. जसलीन आणि अनुप जलोटा यांच्या रिलेशनशिप वर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. भजन सम्राट अनुप जलोटा असं काही करतील यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. पण या अजब गजब जोडीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

एवढेच नाही तर अनुप जलोटा आणि जसलीन यांच्या वर सोशल मीडियावरही मिम्स, शायरी, जोक्स व्हायरल झाले आहेत. जसलीन आणि अनुप यांच्या नात्याला जसलीनचे वडील केसर मथारू यांनी नाकारलं आहे. केसर मथारू यांनी हे सर्व बनावट असल्याचा दावा केला आहे. शेवटी घराबाहेर आले तेव्हा अनुप जलोटांनी हे सगळं पब्लिसिटीसाठी केल्याचे सांगत यावर सारावसारव केली. आता पुन्हा हि जोडी चर्चेत आली आहे.

जसलीनचे लग्न होणार असून अनूप जलोटा तिचे कन्यादान करण्यासाठी तयार आहेत. ‘मी जसलीनसाठी कन्यादान करेल, ती माझ्या मुलीसारखी’ असे जलोटा म्हणाले..