…म्हणून जसप्रीत बुमराहने बहिणीला दिलं ‘सरप्राईझ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गोलंदाजीची सध्या फॉर्मात असलेल्या जसप्रीत बुमराची वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड झालेली आहे. १४ ऑगस्ट रोजी एकदिवसीय तिसरा सामना खेळवला जाणार आहे. यानंतर भारतीय संघ दोन  खेळणार आहेत. यात सध्या आराम करत असलेला जसप्रीत बुमराह कसोटी सामन्यांसाठी वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे. २२ ऑगस्टपासून कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

देश सोडण्याआधी जसप्रीत बुमराहनं आपल्या बहिणीसाठी एक खास गोष्ट केली आहे. रक्षाबंधन गुरुवारी असल्यामुळं वेस्ट इंडिजला रवाना होण्याआधी बहिणीला एक खास सरप्राईज दिले.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असल्यामुळं बुमराह रक्षाबंधन दिवशी हजर राहणार नाही. त्यामुळे त्याने आपली बहिण जुहिका हिच्याकडून राखी बांधून घेतली. रक्षाबंधन १५ ऑगस्टला असलं तरी बुमराहनं दौऱ्यावर जाण्याआधीच २ दिवसआधी साजरी केली. बुमराहनं सोशल मीडियावर याचे फोटो टाकले आहे. वेस्टइंडीझ दौऱ्यावर असल्यामुळे रक्षाबंधनाला गैरहजर असणार आहे परंतु  जुहिकासोबत हा दिवस साजरा केल्याशिवाय राहू शकत नाही. माझ्यासोबत नेहमी राहिल्याबद्दल धन्यवाद. असे  बुमराह पोस्ट केलेल्या एका ट्विटमध्ये लिहिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like