home page top 1

क्रिकेटर जसप्रीत बुमराहच अभिनेत्री अनुपमाशी ‘गॅटमॅट’ ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – घरी बॉलिंग शिकलेला आणि भारताचा प्रमुख बॉलर अशी ख्याती असलेला जसप्रीत बुमराह हा बॉलिंग करत असताना त्याच्या बॉलिंगच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे अनेक बॅट्समन फसतात. असा भारताचा वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह हा सध्या त्याच्या खेळामुळे नाही तर त्याच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. कारण सध्या त्याचे साऊथ अभिनेत्री अनुपमा परमेस्वरन हिच्यासोबत नाव जोडले जातेय. म्हणून तो आता चांगलाच चर्चेत आला आहे.

जसप्रीत अनुपमाला ट्विटरवर फॉलो करत आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बुमराह व अनुपमा अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे सध्या तो त्याच्या खेळापेक्षा जास्त त्याच्या आणि अनुपमाच्या असलेल्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आहे.

दरम्यान बुमराह हा 7 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे छत्र हरपले. यामुळे जसप्रीतला त्याची आई दलजीतने मोठं केलं. टीव्हीवर क्रिकेट सामने पाहून जसप्रीत घरी वेगवान गोलंदाजीची प्रॅक्टिस करायचा. भिंतींवर चेंडू टाकून तो हा खेळ खेळत असे. त्यामुळे पुढे जाऊन तो बॉलर म्हणून प्रसिद्धी झोतात आला. आणि आता क्रिकेटनंतर पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला ते त्याच्या आणि अनुपमाच्या प्रेमाच्या अजब केमिस्ट्रीनंतर.

तसेच अनुपमा ही पण एक साऊथ अभिनेत्री आहे. तिने मल्याळम चित्रपटात काम केले आहे. आणि तेलगू इंडस्ट्रीतही डेब्यू झाला आहे. सध्या ती अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करतेय. लवकरच तिचा ‘रक्षासुदु’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

परंतु, सध्या तरी अनुपमा ही सुद्धा बुमराहसोबतच्या रिलेशनशिपबद्दल बोलायला तयार नाही. आम्ही फक्त मित्र आहोत असे तिने म्हंटले आहे. आणि बुमराहनेही अद्याप याबद्दल काहीही खुलासा केलेला नाही. त्यामुळे भविष्यात याबद्दल तो काय बोलतो. तेही लवकरच कळेल. पण तोपर्यंत आपल्याला प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Loading...
You might also like