बुमरावर बुमरँग : हॉटेल बाहेरच्या ‘त्या’ कृत्यामुळे बुमरा झाला ट्रोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपटूंवर आपल्या कृत्यांमुळे टीका होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या वक्तव्यामुळे हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल हे दोघेही टीकेचे धनी झाल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच आता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सध्या सोशल मीडियावर भलताच ट्रोल होताना दिसत आहे.

सध्या सारेच आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. खेळाडूही कसून सराव करत आहेत. बुमरा हा आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघातील प्रमुख गोलंदाज आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सने बुमराचा सराव करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. परंतु बुमराचा व्हिडीओ त्याच्यावरच बुमरँग झाल्याचे म्हटले जात आहे. कारण तो चांगलाच ट्रोल झाला आहे.

या व्हिडीओमुळे बुमरा हाॅटेलमध्ये आल्यापासूनचे फुटेज दाखवण्यात आले आहे. त्यात दिसत आहे की, बुमरा गाडीतून उतरत आहे. त्यानंतर तेथील गेटकिपर त्याला नमस्कार करतो. त्यानंतर गेटकिपर बुमराशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे करतो परंतु त्या गेटकिपरकडे न पाहताच बुमरा सरळ पुढे निघून जातो. त्याच्या या वागण्यामुळे बुमरा टीकेच धनी झाला असून चांगलाच ट्रोल होत आहे. आजच्या क्रिकेटपटूंना माणुसकी नसल्याची टीका सध्या होताना दिसत आहे.

मुंबईत सामने कधी?

24 मार्च : मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई

3 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई

10 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई

13 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई

15 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई

2 मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद, मुंबई

5 मे : मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, मुंबई