Jasprit Bumrah | “जसप्रीत बुमराह फेरारी आहे, रोज चालणारी टोयोटा कार नाही”, PAK च्या माजी कर्णधाराने बुमराहवर टीका करणाऱ्यांना सुनावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टी-20 विश्वचषक 2022 (T-20 World Cup 2022) सुरु होण्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे या वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. बुमराह मागील मोठ्या कालावधीपासून दुखापतीचा सामना करत आहे. याच दुखापतीमुळे बुमराहला आशिया कपला (Asia Cup) सुद्धा मुकावे लागले होते. जसप्रीत बुमराह या वर्ल्ड कपमधून बाहेर गेल्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. यादरम्यान पाकिस्तानी (Pakistan) संघाचा माजी कर्णधार सलमान बट्टने (Salman Butt) बुमराहची बाजू घेत भारतीय संघाच्या व्यवस्थापन समितीला इशारा दिला आहे. (Jasprit Bumrah)

काय म्हणाला सलमान बट्ट?

“जसप्रीत बुमराहची ॲक्शन अशी आहे की त्याचा पूर्ण लोड पाठीवरच पडतो. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. याशिवाय आयपीएलसारख्या (IPL) मोठ्या स्पर्धेमध्ये देखील तो खेळत असतो. बुमराह हा फेरारी कार, ॲस्टन मार्टिन किंवा लॅम्बोर्गिनीसारखा आहे. यापद्धतीने महागड्या गाड्यांचा वेग असतो. त्यांना वीकेंड कार म्हटले जाते. हे तुमच्या टोयोटा कोरोलासारखे नाही, जी दररोज आणि सगळीकडे चालवली जाऊ शकते.”  बुमराहला सांभाळून ठेवण्याची गरज “प्रत्येकजण ते स्क्रॅच करू शकतो. वीकेंड कार म्हणजे अर्थातच यांना वीकेंडलाच चालवायला हवे. बुमराहसारख्या वेगवान गोलंदाजाला सांभाळून ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात त्याला खेळवणे टाळायला हवे”, असे सलमान बट्ट म्हणाला आहे. (Jasprit Bumrah)

टी-20 वर्ल्ड कप साठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे :

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत,
दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल,  भुवनेश्वर कुमार,  हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

Web Title :- Jasprit Bumrah | jasprit bumrah is a ferrari not an everyday toyota said salman butt

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mohammad Rizwan | मोहम्मद रिझवानने रचला विक्रम, अशी कामगिरी करणारा पाकिस्तानचा पहिलाच क्रिकेटपटू

Traffic Jam In Pune Due To Heavy Rain | शुक्रवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरभर वाहतुकीचा खेळ खंडोबा; 60 ठिकाणी झाडपडी