IND Vs SA : जसप्रीत बुमराह दुखापतीमुळं कसोटी मालिकेतून बाहेर, ‘या’ बॉलरला ‘सुवर्ण’ संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताला दक्षिण अफ्रिकेच्या विरोधात होणाऱ्या टेस्ट सीरिज आधीच मोठा झटका बसला आहे. स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्याने त्याला सीरीजमधून बाहेर काढण्यात आले. भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान होणारी मॅच ऑक्टोबर पासून खेळवण्यात येणार आहे. ही सीरीज वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा भाग आहे. यामुळे दोन्ही संघ याला अत्यंत गांभीर्यांने घेत आहेत.

बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली की बुमराहच्या कमरेत फ्रॅक्चर आला आहे, यामुळे तो गांधी मंडेला ट्रॉफीच्या टेस्ट सिरीजला मुकावे लागणार आहे. त्याच्याजागी उमेश यादवला संधी देण्यात आली आहे.

25 वर्षीय बुमराहने 12 कसोटी, 58 वनडे आणि 42 टी 20 खेळल्या आहेत. 12 कसोटी सामन्यात त्याने 62 विकेट घेतल्या आहेत. त्याने सर्व सामने परदेशात खेळले आहेत. त्यांच्या स्थानी घेतलेल्या उमेश यादवने 41 कसोटी सामने खेळले आहेत त्याने त्यात 119 विकेट घेतल्या आहेत. 31 वर्षीय उमेश यादवने 75 वनडे आणि 7 टी 20 सामने खेळले आहेत.

जसप्रीतच्या दुखापतीची माहिती आल्यानंतर माजी गोलंदाज चेतन शर्माने सांगितले की मला वाटते की बुमराहला भारतात होणाऱ्या कसोटी सामन्यात आराम दिला पाहिजे. आपण त्याची प्रतिभा वाया घालू शकत नाही. सर्वांनाच महित आहे की तो जगातील सर्वात चांगला पेसर आहे.

भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या दरम्यान 14 वी टेस्ट सीरीज खेळली जाणार आहे. दोन्ही टीम सीरिजचा पहिला सामना 2 ऑक्टोबरला खेळेल. हा सामना विशाखापट्टमण येथे होणार आहे. सीरीजचा दुसरा सामना रांची आणि तिसरा सामना पुणे येथे होणार आहे. दोन्ही देशात मागील 13 सीरिजमधील 7 सामने दक्षिण अफ्रिकेने जिंकले आहे. भारताने 3 सीरीज जिंकल्या आहेत.

भारताचा संपूर्ण संघ असा असेल 
विराट कोहली, मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदिप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल यांचा संघात समावेश असेल.