जेव्हा महागडा शूज घेऊन देवू शकली नाही… जसप्रीत बुमराहची आई झाली भावूक केले अनेक खुलासे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा सध्या आपल्या पाठदुखीवर उपचार घेत आहे. त्याचदरम्यान त्याची आई दलजीत बुमराह यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये त्या बुमराच्या लहानपणातील संघर्ष सांगताना भावुक झालेल्या दिसून येत आहेत.

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या बुमरा याला 2013 साली मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले होते. त्यानंतर आता त्याच्या मेहनतीच्या जोरावर तो मुंबई संघातील आणि भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज बनला आहे. या व्हिडिओमध्ये त्याची आई सांगत आहे कि, तो पाच वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाला मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला.

त्यांनी लहानपणीची एक आठवण सांगितली कि, जसप्रितसाठी एक नाईकीचा बूट खरेदी करण्यासाठी आम्ही शोरूममध्ये गेलो होतो, मात्र तो आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त महाग होता. आम्ही तो न घेताच परत आलो, मात्र बुमरा याने म्हटले कि, एक दिवस मी तो बूट खरेदी करणारच, आणि आज खरंच त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात बूट आहेत. त्याचबरोबर आणखी आठवणी सांगताना त्यांनी सांगितले कि, त्याच्याकडे क्रिकेट खेळण्यासाठी देखील एकच ड्रेस असे, मी तो दररोज धुवत असे, जेणेकरून तो त्याला दुसऱ्या दिवशी वापरता येईल.

त्याचबरोबर या व्हिडिओत बुमरा म्हणतो कि, तुम्ही अनेकदा ऐकले असेल कि, तुम्हाला कुणी खेळताना पहिले आणि निवडले. मात्र माझ्या बाबतीत हे खरोखर घडले आहे. दरम्यान, या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यादेखील बुमराचे कौतुक करताना दिसून येत आहेत.

जसप्रीत बुमरा याचे प्रदर्शन
कसोटी : 12 सामने 62 विकेट
एकदिवसीय : 58 सामने , 103 विकेट
टी-20 : 42 सामने , 51 विकेट
फस्र्ट क्लास : 38 सामने , 151 विकेट
लिस्ट ए : 83 सामने , 155 विकेट
टी-20 : 149 सामने , 174 विकेट

visit : policenama.com