Jasprit Bumrah Marriage : ‘क्रिकेटर’ जसप्रीत बुमराहनं अँकर संजना गणेशन सोबत केलं लग्न ! (फोटो)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा फेमस क्रिकेट प्रेझेंटेटर संजना गणेशन (Sanjana Ganesan) सोबत विवाहबद्ध झाला आहे. खुद्द जसप्रतीनं ट्विट करत सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांसह काही मोजकीच लोकं या लग्नाला उपस्थित होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची सोशलवर चर्चाही सुरू होती. इंटरनेटवर दोघंही ट्रेंड करताना दिसत होते.

कोण आहे संजना गणेशन ?
संजना ही फेमस क्रिकेट प्रेझेंटेटर आहे. आजवर तिनं अनेक क्रिकेट कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. आयपीएल (Indian Premier League – IPL) मधील कोलकाता नाईट रायडर्ससाठी फॅन शो देखील तिनं होस्ट केला आहे. 28 वर्षीय संजना गणेशन आयपीएलमध्ये सक्रिय राहण्यासोबतच स्टार स्पोर्टसोबतही कनेक्टेड आहे. संजना आणि जसप्रीत दोघंही क्रिकेटमध्ये आहेत. हेच कारण होतं की, गेल्या काही दिवसांपासून दोघांचंन नाव जोडलं जात होतं.

संजनाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर संजनानं पुण्यातील प्रसिद्ध विद्यापीठातून पदवी घेतली आहे. ती मॉडेलिंग करतानाही दिसली आहे. 2014 साली संजनानं मिस इंडियाच्या मंचावर आपलं नशीब आजमावलं होतं. तिथं तिनं फायनलपर्यंतचा टप्पा गाठला होता. यानंतर 2013 साली तिनं फेमिना गॉर्जियसचा किताब देखील आपल्या नावावर केला होता.

संजनाला फिट रहायला खूप आवडतं. यासाठी ती जीम आणि योगा करते. ती आयपीएलमधील टीम कोलकाता नाईट रायडर्सचीही अँकर होती. एमटीव्हीवरील रिॲलिटी शो स्प्लिट्सव्हिला मधून टीव्हीवर डेब्यू केला होता.