जसप्रीत बुमराहला प्रतिष्ठेचा ‘पॉली उम्रीगर’ पुरस्कार जाहीर, BCCI ची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) रविवारी २०१८ – १९ च्या वार्षिक पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला प्रतिष्ठेत अश्या पॉली उम्रीगर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. वर्षभरातील त्याच्या उत्तम कामगिरीमुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

बीसीसीआयने सांगितले कि, जानेवारी २०१८ मध्ये आयसीसीच्या वनडे क्रमवारीत बुमराहने आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघांविरुद्ध प्रत्येकी ५ विकेट घेण्याची कामगिरी केली. ही कामगिरी करणारा तो पहिला आणि एकमेव आशियाई गोलंदाज ठरला आहे. तसेच बुमराहने एक ऑक्टोबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या ६ कसोटी सामन्यांमध्ये ३४ विकेट घेतल्या. तर १७ वनडेत ३१ विकेट आणि ७ टी-२० सामन्यात ८ विकेट घेतल्या. त्यामुळे त्याला हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला.

तसेच गेल्या वर्षी कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा त्यांच्याच देशात पराभव केला होता. भारतीय संघाच्या या विजयात बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळी, पुरुषांच्या विभागात बुमराहला सर्वोच्च पुरस्कार मिळाला तर महिला क्रिकेटपटूंमध्ये पुनम यादवला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. पुनमने १ ऑक्टोबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात ८ वनडेत १४, १५ टी-२० सामन्यात २० विकेट घेतल्या आहेत. तसेच भारतीय संघाचे माजी कर्णधार के. श्रीकांत आणि अंजुन चोप्रा यांना कर्नल सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. १९८३ च्या वर्ल्ड कप विजयी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात श्रीकांत यांनी भारताकडून सर्वाधिक ३८ धावा केल्या होत्या. तसेच २०११मध्ये वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय संघाची निवास श्रीकांत यांनीच केली होती. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ते भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख होते.

भारताकडून १०० वनडे खेळणारी अंजुन चोप्रा ही पहिली महिला क्रिकेटपटू आहे. आपल्या १७ वर्षाच्या कारकीर्दीत अंजुने ४ वर्ल्ड कप आणि दोन टी – २० वर्ल्ड कप स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व केले. तसेच यावेळी अन्य पुरस्कारांमध्ये चेतेश्वर पुजारा, मयांक अग्रवाल यांचा गौरव केला जाणार आहे. दरम्यान, या पुरस्कारांच्या यादीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहील आणि हिटमॅन रोहित शर्मा याचा समावेश नाही.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/