ICC World Cup 2019 : वर्ल्डकप नंतर वेस्टइंडीजच्या सिरीज मध्ये भारताचे ‘हे’ २ हुकमी एक्के नाहीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वचषकात चमकदार कामगिरी करणारा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमरा या दोघांना BCCI ने वेस्टइंडीज च्या विरोधात अमेरिकेत आणि कॅरेबियन देशांमध्ये होणाऱ्या टी-20 आणि वन डे मालिकेसाठी आराम दिला आहे. ही सीरीज तीन ऑगस्ट पासून खेळली जाईल. त्यानंतर होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधील २ कसोटी सामन्यांमधून ते पुनरागमन करतील.

भारतीय क्रिकेट टीम तीन ऑगस्ट पासून वेस्टइंडीज दौऱ्यावर असेल. यादरम्यान होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये दोन कसोटी सामनेदेखील आहेत. हे कसोटी सामने अँटीगुवा येथील विवियन रिचर्ड्स क्रिकेट ग्राउंड (२२-२६ ऑगस्ट) आणि जमैका येथील सबिना पार्क (३०ऑगस्ट ते ३ सप्टेंबर सितंबर) येथे खेळले जातील.

बीसीसीआई च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्या ने म्हटले, ‘विराट आणि जसप्रीत यांना तीन सामन्यांची टी-20 इंटरनेशनल आणि तीन सामन्यांची वनडे सीरीज साठी आराम दिला जाईल. कारण विराट ऑस्ट्रेलिया सिरीज सुरु झाल्यापासून सातत्याने खेळतो आहे आणि बुमराची खेळीदेखील भरात आहे. हे दोघे कसोटी सामान्यांमधून पुनरागमन करतील.

क्रिकेट विश्वकपाचे कठीण आव्हान पेलल्यानंतर इतरही काही खेळाडूंना आराम दिला जाण्याची शक्यता आहे. जर भारत अंतिम सामान्यांपर्यंत पोहोचला तर प्रमुख खेळाडू १४ जुलै पर्यंत खेळत राहतील त्यामुळे काही फलंदाज आणि गोलंदाजांना आराम करणे गरजेचे असेल. BCCI ने वेस्टइंडीज दौऱ्याच्या बनविलेल्या वेळापत्रकानुसार कसोटी सामने टी-20 आणि वनडे नंतरच खेळले जातील. पहिला कसोटी सामना २२ ऑगस्ट पासून सुरु होणार असल्याने वर्ल्ड कप टीममधील प्रमुख खेळाडूंना आरामासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

अर्धशिशी म्हणजे काय ? जाणून घ्या, करा हे उपाय

नंबर वाढला तर चष्म्याची लेन्स नियंत्रित करा, बदलण्याची गरज नाही

मनाची एकाग्रता वाढवायची आहे का ? करा ‘हे’ उपाय

वेळ नसेल तर … फिटनेससाठी सूर्यनमस्कारही पुरेसे