जेव्हा जसवंत सिंह यांनी सांगितली होती त्यांची संपत्ती, 51 गायी, 3 अरबी घोडे अन् 13 बंदूका

नवी दिल्ली : भाजपाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जसवंत सिंह यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांनी संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख तसेच अनेक जबाबदार्‍या पार पाडून देशाची सेवा केली होती. एक प्रभावी मंत्री आणि खासदार म्हणून त्यांची ओळख होती.

लोकसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार जसवंत सिंह यांनी आपल्या संपत्तीची जेव्हा घोषणा केली होती, त्यानुसार त्यांच्याकडे गाई आणि घोडेसुद्धा होते.

त्यांनी सांगितले होते की, त्यांच्याकडे 51 गाई आणि तीन अरबी घोडे आहेत. त्यांच्याकडे थारपरकर जातीच्या गाई आहेत, ज्या तेथील स्थानिक प्रजातीच्या आहेत. या गाई त्यांच्या जैसलमेर तसेच जोधपुरच्या फार्ममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

जसवंत सिंह यांच्याकडे 3 अरबी घोडे सुद्धा होते. यापैकी दोन त्यांना सौदी अरबच्या राजकुमाराने दिले होते. जोधपुरमध्ये जसवंत सिंहचा फार्म हाऊस आहे, जेथे गाईंचे प्रजनन होते.

मुलगा भूपेंद्रनुसार, जसवंस सिंह यांनी या गाई आणि रेडे तेथील एका रिसर्च सेंटर तसेच गोशाळेत दान दिल्या आहेत.

जसवंत सिंह यांच्याकडे 7 कोटी रूपयांची संपत्ती आहे. जसवंत सिंह यांच्याकडे सहा गाड्यासुद्धा होत्या, ज्यापैकी दोन त्यांच्या पत्नीच्या नावावर आहेत.

जसवंत सिंह 1960 मध्ये लष्करातून मेजर पदाचा राजीनामा देऊन राजकारणाच्या मैदानात उतरले होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील राजग सरकारमध्ये ते आपल्या करियरच्या उच्चस्थानी होते. 1998 ते 2004 पर्यंत राजगच्या शासन काळात त्यांनी अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाचे नेतृत्व केले होते.

जसवंत यांची राजकीय कारकिर्द अनेक चढ-उतारांची होती. यादरम्यान वाद नेहमी त्यांच्या अवतीभवती असत. 1999 मध्ये एयर इंडियाच्या अपहृत विमानातील प्रवाशांना सोडवण्यासाठी दहशतवाद्यांच्यासोबत कंधारला जाण्याच्या प्रकारणात त्यांच्यावर खुप टिका झाली होती. राजग शासनकाळात जसवंत सिंह अटल बिहारी वाजपेयी यांचे सर्वात विश्वासू आणि जवळचे सहकारी होते. ते ब्रजेश मिश्र आणि प्रमोद महाजन यांच्यासोबत वाजपेयींच्या टीममध्ये महत्वाचे सदस्य होते.

नंतर ते 2009 पर्यंत राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते आणि गोरखालँडसाठी संघर्ष करणार्‍या स्थानिक पक्षांच्या आवाहनावर ते दार्जिलिंगमधून निवडणूक लढले आणि विजयी झाले. जसवंत सिंहना अशा समस्येचा सामना करावा लागला, जेव्हा ऑगस्ट 2009 मध्ये त्यांना आपले पुस्तक ‘जिन्ना : भारत विभाजन और स्वतंत्रता’ मध्ये पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांची स्तूती केल्याने भाजपातून काढून टाकण्यात आले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like