जत पोलिसांकडून दीड लांखांचा गांजा जप्त

येळवी : पोलीसनामा ऑनलाईन

पिकामध्ये गांजाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात छापा टाकून दीड लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारारवाई जत तालुक्यातील खलाटी येथे मंगळवारी (दि.१८) सकाळी आठ वाजता करण्यात आली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6c8ee1c4-bb49-11e8-814c-1daf51d5ff28′]

जत येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मिष्ठा वालावलकर, साय्यहाक पोलीस निरीक्षक रणजीत गुंडरे यांच्यासह पोलिस पथकाने लक्ष्मण निवृत्ती शिंदे यांच्या शेतावर छापा टाकून  शेतातील एक लाख ५१ हजार किंमतीचा गांजा पकडून एका आरोपीला ताब्यात घेतले.

पाकीटमारीच्या हिश्श्यावरून हौदात बुडवून केला खून 

जत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील खलाटी येथे लक्ष्मण निवृत्ती शिंदे यांचे शेतातील भेंडीच्या पिकात गांजाची लागवड केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी  शर्मिष्ठा वालावलकर यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गुडरे पोलीस हवालदार प्रशांत गुरव, मुल्ला मुजावर, व्हनखङे यांना बरोबर घेऊन छापा टाकला. या छाप्यात भेंडीच्या शेतातील दोन ते चार फुट उंचीचे ३२० गांजाची झाडे दिसून आली.  त्याची किंमत एक लाख ५१ हजार १६५ रुपये  असून पोलीसांनी गांजासह आरोपीला ताब्यात घेतले आहे. जत पोलीसात याबाबत गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास जत पोलीस करीत आहे.