पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Jatan Foundation | कोविड काळानंतर जगभरात वैद्यकीय क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. यामुळे जी एन एम नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी जर्मनीमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी रविवारी (दि ७ जुलै) मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जतन फाउंडेशनचे रवींद्र झेंडे (Ravindra Zende) यांनी दिली.
महाराष्ट्रात जी एन एम या कोर्सला अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. त्यामुळे या कोर्सला या प्रवर्गातून मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतले जातात. या प्रवर्गातील प्रशिक्षित तरुण तरुणींना जर्मनी मध्ये काम मिळवून देण्यासाठी जतन फाऊंडेशन यांनी करार केला असून मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध आहे.
याचबरोबर कोणत्याही शाखेत १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यासाठी नर्सिंगचा अभ्यासक्रम अप्रेंटिसशीप पद्धतीने कमवा आणि शिका अशा योजनेतही जर्मनीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. रविवारी (दि. ७ रोजी ) दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत नवी पेठेतील एम. एम. जोशी फाउंडेशनमध्ये हे सेमिनार होणार आहे. जतन फाऊंडेशन आणि फिनकॉम एड्युव्हेंचर्स यांच्यावतीन या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
जी एन एम , बी एस सी (नर्सिंग), पी बी एस सी , एम एस सी (नर्सिंग), हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. सेमिनार मध्ये जर्मनीमध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधी, विसा, परमनंट रेसिडेन्सी , पदव्युत्तर नर्सिंग अभ्यासक्रम आणि जर्मनीतील कामगार कायदे याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | पुणे: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
Yerawada Pune Crime News | पुणे : बालसुधारगृहात राडा, डोक्यात फरशी घातल्याने अल्पवयीन मुलगा जखमी