पावसाळयात थंडीनंतर ताप येणं हे ‘कावीळ’चं असू शकतं लक्षण, जाणून घ्या 8 लक्षणे अन् त्यावरील 4 उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कावीळ हा आजार उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सर्वाधिक उद्भवत असतो. कावीळ झाल्यावरती शरीरात रक्ताची कमतरता भासते. तसेच त्वचेचा रंग देखील पिवळा पडतो. रक्तामधील हिमोग्लोबीन कमी झाल्यामुळे अशी समस्या निर्माण होते. हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर शरीरातील बिलीरुबीन नावाचा पिवळ्या रंगाचा पदार्थ बाहेर पडतो. हा पदार्थ लिव्हरमधून फिल्टर होऊन बाहेर पडत असतो. याच प्रमाण वाढल्यावर त्वचेचा आणि डोळ्याचा रंग सातत्याने पिवळा होत जातो. म्हणून या आजाराला कावीळ असं म्हटलं जातं. ही समस्या लिव्हरशी संबंधित आहे. वेळेत या आजाराकडे पाहिलं नाही तर गंभीर परिणाम उद्भवू शकतात. तर आता आपण जाणून घेणार आहोत या आजाराची लक्षणे आणि उपाय.

लक्षणे

१. सतत थकवा जाणवणं

२. डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा होणं

३. थंडी वाजणं

४. ताप येणं

५. पोटदुखी, पोटाच्या वरील भागात दुखणे

६. लघवीचा रंग बदलून जास्त पिवळा असणं

७. उलट्या होणं

८. वजन वाढणं

उपाय

१. काविळीसारख्या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी संतुलित आहार घेणे. सगळ्यात महत्वाचं पोटभर पाणी प्या. दारु अथवा नशायुक्त पदार्थाचं सेवन करु नका. नियमित व्यायाम, योगा करा.

२. टोमॅटोचा रस काविळीवर गुणकारी असल्याचं सांगतात. रोज सकाळी उठून टोमॅटोचा रस प्या. टोमॅटोचा रस नुसता पिणं शक्य नसेल तर त्यात मीठ आणि मिरपूड घालून प्या.

३. तुळशीचे औषधी गुण कावीळ बर करण्यासाठी चांगले असतात. म्हणून तुळशीची पानं चावून खावी. या उपायाने बचाव करता येऊ शकतो.

४. काविळीत तुमच्या लिव्हरला त्रास उद्भवू शकतो. लिव्हरचे काम चांगले करण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरतो. त्यामुळे तुम्ही दिवसातून कमीतकमी २ ते ३ वेळा लिंबाच्या रसाचे पाण्यासोबत सेवन करा.

या पदार्थांचे सेवन टाळा

कावीळ झाली असेल तर तेलकट पदार्थ, तिखट पदार्थ, मांसाहार, जास्त मीठ, सोडियमजन्य पदार्थाचे सेवन टाळा. उघड्यावरचे अन्नपदार्थ, वडा, भजी अशा पदार्थाचे सेवन करु नका. तसेच जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे नक्की जा.