पोलिस कोठडीत युवकाचा मृत्यू, स्टेशन प्रभारी अधिकार्‍यासह 4 पोलिस कर्मचार्‍यांवर FIR

जौनपुर : उत्तर प्रदेशच्या जौनपुर जिल्ह्यात पोलीस कस्टडीत एका तरूणाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मृत तरूणाच्या भावाने पोलीस ठाण्याच्या प्रमुखासह चार पोलीस कर्मचार्‍यांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. जौनपुर जिल्ह्यात कृष्ण कुमार यादव नावाचा एक तरूण लुटमारीच्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात होता. परंतु या दरम्यान त्याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. ज्यानंतर मृताचा भाऊ अजय यादवने बक्सा पोलीस ठाण्याचे प्रमुख अजय सिंह यांच्यासह चार पोलीस कर्मचार्‍यांविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

या पोलीस कर्मचार्‍यांवर आयपीसीचे कलम 302,394,452, 504 च्या अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

तरूणाच्या हत्येनंतर परिसरात संताप वाढत चालल्याने पोलीस दलाची झोप उडाली आहे. ज्यामुळे अतिरिक्त सुरक्षेची व्यवस्था पोलीस ठाण्याच्या परिसरात करण्यात आली आहे. मृत तरूण कृष्ण कुमार यादवचा पोलीस कस्टडीत संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरातील लोकांमध्ये मोठा संताप आहे, ज्यामुळे त्यांनी रास्तारोको सुद्धा केला होता.