‘शांतीच्या गोष्टी करणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासून गाढवावरुन धिंड काढा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सर्व देशातून निषेध होत आहे. इतकेच नाही तर, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची जनतेकडून मागणी केली जात आहे. सर्वसामान्यांसह बॉलिवूडमधूनही याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना दिसत आहे. कंगणा रणौत हिनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगना रणौतनेही संताप व्यक्त करत पाकिस्तानचं निमंत्रण स्विकारल्याबद्दल जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्यावर टीका केली आहे. जावेद अख्तर आणि शबाना आझमी देशद्रोही असल्याचं कंगणाने म्हटलं आहे. शांतीच्या गोष्टी करणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासून त्यांची गाढवावरुन धिंड काढा असे म्हणत तिने नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर निशाणा साधला.

कंगणाला जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्या पाकिस्तान जाण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना तिने त्यांच्यावर देशद्रोही असल्याची टीका केल्याचे दिसून आले. ती म्हणाली की, जावेद अख्तर आणि शबाना आझमी पाकिस्तानशी संस्कृतीचं अदान-प्रदान करतात. हे तेच लोक आहेत जे ‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांचं समर्थन करतात. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. तरी शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांना पाकिस्तानमध्ये कार्यक्रम घेण्याची गरज का वाटली?” असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे.

‘शांतीच्या गोष्टी करणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासून त्यांची गाढवावरुन धिंड काढा’

दरम्यान पुलवामा हल्ल्यानंतर यावर आपली प्रतिक्रिया देताना माजी क्रिकेटपटू काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी शुक्रवारी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी हिंसा नव्हे तर संवाद हवा, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचाही कंगणाने समाचार घेतला आहे. सिद्धू यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. आता जो शांततेबद्दल बोलेल त्याला रस्त्यावर आडवून कानाखाली मारा असे वक्तव्य कंगनाने केले आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली की, “जवानांवर हल्ला केला जात आहे आणि काही लोक अहिंसा आणि शांतीच्या गोष्टी करत आहेत. असं म्हणणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासून त्यांची गाढवावरुन धिंड काढली पाहिजे.”

शबाना आझमी -जावेद अख्तर यांचा पाकिस्तान दौरा रद्द

जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांना कराची आर्ट काॅन्सिलकडून कराची साहित्य महोत्सवाचं आमंत्रण आलं होतं. यासाठी दोघांनीही हे आमंत्रण स्वीकारलं होतं शिवाय यासाठी त्यांचा दोन दिवसांचा दौरा करण्याचेही ठरले होते. २३ आणि २४ फेब्रुवारीला हा कार्यक्रम होणार होता. मात्र पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत या दोघांनीही पाकिस्तानमध्ये न जाण्याचा निर्णय घेत हा दौरा रद्द केला.