जावेद अख्तरांनी पाक PM इम्रान खानला ‘झाप झाप झापलं’ ! म्हणाले, ‘हे’ आठवतयं का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या पंतप्रधान इमरान खान यांच्यावर आता प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी निशाणा साधला आहे. इमरान खान सतत भारताविरोधात गरळ ओकत आहे. अशाच एक ट्विटवर जावेद अख्तर यांनी इमरान खान यांना झापले आहे.

इमरान खान हे ट्विटरवर म्हणाले होते, हिंदुत्ववादी मोदी सरकार फक्त पाकिस्तानसाठी धोकादायक नाहीत तर त्यांच्याच देशातील अल्पसंख्यांकांसाठी देखील धोकादायक आहेत. यशिवाय नेहरु आणि गांधीच्या हिंदुस्तानसाठी देखील धोकादायक आहे. जातीय नरसंहारच्या विचाराचे आरएसएस – बीजेपीच्या संस्थापकांंची नाझी विचारधारा असलेले संबंध समजून घ्यायचे असतील तर फक्त गूगल करा.

याच ट्विटवर जावेद अख्तर यांनी इमरान खानला चांगलेच सुनावले आहे आणि सवाल केला, मी यामुळे खूप प्रभावित झालो, की तुम्ही नेहरु आणि गांधींच्या फॅब्रिक असलेल्या हिंदुस्तानची इतकी काळजी करतात. परंतू नेहरु आणि गांधींची तीच चौकट जिना यांनी १९४७ साली तोडली. हे तुम्हाला आठवतेय?

जावेद अख्तर यांनी ट्विट करत इमरान खान म्हणाले, ही चूक ठरेल जर मी तुम्हाला अल्पसंख्यांच्या बद्दल चिंतचे कौतूक केले नाही. मी याची कल्पना देखील करु शकत नाही की तुम्ही दुसऱ्याबद्दल एवढा विचार करतात आणि त्यांच्यासाठी जर तुम्ही एवढे प्रोटेक्टिव आहेत तर मग तुम्ही तुमच्या देशातील हिंदूंना, खिश्चन धर्मियांबद्दल आणि बलुचिस्तानातील लोकांच्या सुरक्षेबद्दल देखील विचार करत असतील.

आरोग्यविषयक वृत्त –