Javed Akhtar | वादग्रस्त विधानावरुन जावेद अख्तर यांच्या विरोधात FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन-   Javed Akhtar | सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी जसे तालिबानमध्ये काही इस्लामी संघटना नागरिकांना त्रास देत आहेत धर्माच्या नावावरती तालिबानमध्ये लोकांचा छळ केला जात आहे, तशा तालिबानी माणसिकतेचे लोक म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आणि या संस्थांना समर्थन करणारे लोकं तालिबानी प्रवृत्तीचीच असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे जावेद अख्तर यांच्या विरोधात आज (सोमवारी) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विरोधात वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दरम्यान, मुंबईतील वकिल संतोष दुबे (Lawyer Santosh Dubey) यांनी याबाबत तक्रर दिली आहे.
यावरुन मुंबई पोलिसांनी मुलुंड पोलिस ठाण्यात (Mulund Police Station) हा गुन्हा दाखल केला आहे.
जावेद अख्तर  यांनी वादग्रस्त वक्तव्ये केल्याने त्यांच्या विरोधात तक्रारदाराकडुन बदनामीची नोटीस देखील जारी करण्यात आली आहे.

दरम्यान, या मुलाखतीत अख्तर यांनी संघाची तुलना तालिबानशी केली होती. संघ आणि तालिबान या दोन्हीं संघटना धार्मिक कट्टरपंथीय संघटना असल्याचे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. असं वकिल संतोष दुबे (Lawyer Santosh Dubey) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Javed Akhtar | FIR against Javed Akhtar over controversial statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sharad Pawar | ‘…तर मी शरद पवार यांच्या दौऱ्यात गाडीसमोर झोपणार’

Amitabh Bachchan Caller Tune | कोविड-19 कॉलर ट्यूनने तुम्हाला थकवलेय का? जाणून घ्या तात्काळ बंद करण्याची प्रक्रिया