4 वर्षांपूर्वीची ‘बातमी’ शेयर केल्यावर ‘ट्रोल’ झाले गीतकार जावेद अख्तर, लोक म्हणाले – ‘किती पेग झाले…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदी सिने सृष्टीतील प्रख्यात गीतकार, लेखक आणि कवी जावेद अख्तर यांना ट्विटरवर एक ट्विट केल्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. चार वर्ष जुना एक फोटो ट्विट केल्याने ते मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. त्याचबरोबर जुना फोटो शेअर केल्याने त्यांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत थट्टा देखील करण्यात येत आहे.

जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो 2015 मधील असून उत्तरप्रदेशमधील एका पोलिसाने एका व्यक्तीचा टाईपरायटर तोडला. हा फोटो शेअर करत अख्तर यांनी लिहिले कि, हा वृद्ध व्यक्ती बेरोजगार लोंकांसाठी आवेदने टाईप करण्याचे काम करत असे. त्यांच्या टाईपरायटर आता दुरुस्त होण्याच्या देखील स्थितीमध्ये नाही. मात्र हे ट्विट करणे त्यांना खूप महाग पडले. यावरून नेटकऱ्यांनी त्यांची थट्टा करत त्यांना ट्रोल केले आहे. Ateendra नावाच्या एका व्यक्तीने त्यांना ट्रोल करत लिहिले कि, किती पॅग मारले आहेत, ज्यामुळे तुम्ही चार वर्षांपूर्वीचा फोटो ट्विट केला आहे. तर Chandan dutta यांनी लिहिले कि, हा फोटो ट्विट करण्याआधी दहा वेळा विचार करायला हवा. त्याचबरोबर विविध नेटकऱ्यांनी देखील त्यांना ट्रोल केले.

दरम्यान, सप्टेंबर 2015 मध्ये लखनौमध्ये एका 65 वर्षीय कृष्ण कुमार नावाची व्यक्ती टाईपरायटरवर अर्ज भरून देऊन आपला उदरनिर्वाह करत असे. मात्र पोलिसाने रागाने त्यांचा हा टाईपरायटर तोडून टाकला होता. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Visit  :Policenama.com

You might also like