शबाना यांच्या प्रकृतीबद्दल जावेद अख्तर म्हणाले, ‘ICU मध्ये परंतु पूर्वीपेक्षा बरी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शनिवारी कार अपघातात जखमी झालेल्या शबाना आझमी यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अभिनेत्रीला पाहण्यासाठी फिल्म आणि राजकारणातील लोक पोहोचत आहेत. सतीश कौशिक नंतर आता शबानाचे पती जावेद अख्तर यांनीही अभिनेत्रीच्या रिकव्हरीबाबत अपडेट दिले आहेत. जावेद स्वत: अपघातावेळी तेथे उपस्थित होते पण ते दुसऱ्या कारमध्ये होते.

Advt.

सतीश कौशिक म्हणाले की, ‘शबाना या सध्या आयसीयूमध्ये आहे. काल (रविवारी) रात्री दहा वाजता मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, पण शबाना यांच्याशी बोलू शकलो नाही. त्यांना डोळ्याभोवती दुखापत झाली आहे. पुढील 48 तास त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील. त्या लवकरच ठीक होतील.’ जावेद अख्तर म्हणाले की, ‘ती पूर्वीपेक्षा चांगली आहे. बर्‍याच चाचण्या करण्यात आल्या, ज्याचा परिणाम पॉझिटिव्ह दिसत आहे. घाबरून जाण्याची गरज नाही. ती सध्या आयसीयूमध्ये आहे पण सर्व रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आहेत. कोणतीही गंभीर जखम नाही.’

यापूर्वी सतीश कौशिक यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘शबाना यांची खूप काळजी घेतली जात आहे. परंतु गेल्या दिवसाच्या तुलनेत आता त्यांच्या तब्येतमध्ये बरीच सुधारणा आहे.’ राज ठाकरे, अनिल अंबानी आणि टीना अंबानी देखील शबाना आझमी यांना भेटण्यासाठी कोकिलाबेन रुग्णालयात पोहोचले होते. त्याचबरोबर फरहान अख्तर, तब्बू, अनिल कपूर आणि आलिया भट्ट यांनाही कोकिलाबेन हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट केले होते.

 

फेसबुक पेज लाईक करा –