‘कंगनाला घरी बोलावून जावेद अख्तर यांनी धमकावलं होत’, बहिण ‘रंगोली’चा धक्कादायक खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची बहिण आणि मॅनेजर रंगोली चंदेलनं दिग्गज लिरिक्स आणि स्क्रिप्ट रायटर जावेद अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. जावेद अख्तर यांनी एकदा कंगनाला आपल्या घरी बोलावलं आणि हृतिकची माफी मागण्यावरून तिला धमकी दिली असं रंगोलीनं म्हटलं आहे.

https://twitter.com/Rangoli_A/status/1229814531662041089

एका ट्विटर युजरच्या ट्विटला उत्तर देताना रंगोली म्हणाली, “जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावलं आणि तिला घाबरवत माफी मागण्यासाठी धमकावलं की, तिनं हृतिक रोशनची माफी मागावी. महेश भट यांनी तिच्यावर चप्पल फेकली जेव्हा तिनं आत्मघाती हल्ला करणाऱ्याची भूमिका साकारण्यास नकार दिला होता. ते पीएम मोदींना फॅसिस्ट म्हणतात. चाचा जी तुम्ही दोघं काय आहात ?”

कंगना रणौत आणि रंगोल चंदेल नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळं चर्चेत येत असतात. रंगोली कंगनाची मॅनेजर आहे आणि बहिणही आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती पंगा सिनेमात दिसली होती. सिनेमानं ठिकठाक कमाई केली. सध्या ती आपला आगामी सिनेम थलायवा ची तयारी करत आहे. यात ती तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव दिवंगत जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे. याचा टीजरही रिलीज करण्यात आला आहे.