संगीतकार जावेद अख्तरांचं ‘ट्रोलर’ला जोरदार ‘प्रत्युत्तर’ ! म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन :संगीतकार जावेद अख्तर यांनी अलीकडेच त्यांना ट्रोल करणाऱ्या एका ट्रोलरला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जावेद यांनी दिलेल्या उत्तरांना त्याची बोलतीच बंद आहे. सध्या देशात लॉकडाऊन असला तरी सर्व कलाकार सोशलवरून चाहत्यांच्या संपर्कात असतात.

एकानं ट्विटरवर जावेद अख्तर यांना टॅग करत लिहिलं की, जावेद अख्तर जी कुठे आहात. देशाबद्दल आपलं मत मांडा. बिळातच लपून राहणार का ? तुमच्या मताची देशाला गरज आहे. तुमची गँगही दिसत नाहीये.” यावर जावेद अख्तर यांनी अगदी सहजतेनं रिल्पाय दिला.

https://twitter.com/sns1769/status/1244481059531587584

जावेद अख्तर यांनी लिहिलं की, “भावा काही दिवसांसाठी तरी ही तिरस्काराची नशा सोड. माझ्यासारखे लोक जेवढं आणि जे शक्य आहेत करत आहेत. तू फक्त एवढंच कर की, इतरांना विचारत बसण्यापेक्षा हे सांगत जा की, तू का केलंस ?” जावेद अख्तर यांच्या उत्तरानं ट्रोलरची बोलती बंद झाली. जावेद अख्तर यांना ट्विटरवर सपोर्ट मिळताना दिसत आहे.

देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. बाधितांची संख्या रोज वाढताना दिसत आहे. कोरोनामुळं आतापर्यंत 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशात सर्व लोक एकत्र येऊन कोरोनाची लढाई लढताना दिसत आहेत.