जावेद जाफरीचा मुलगा मीजान करतोय ‘बीग बी’ची नात नव्या नंदाला ‘डेट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्टर जावेद जाफरीचा मुलगा मीजान सध्या चर्चेत असल्याचे दिसत आहे. मीजान आपला पहिला सिनेमा आणि बॉलिवूड डेब्यू करण्यासाठी तयार आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, मीजान संजय लीला भन्साळी यांच्या मलाल या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करत आहे. या सिनेमात त्याच्या सोबत संजय लीला भन्साळीच्या बहिणीची मुलगी शरमीन सहगल दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलरही समोर आला आहे. हा ट्रेलर चाहत्यांना पसंत पडतानाही दिसत आहे.

मीजान पहिला सिनेमा येण्याआधीच त्याच्या रिलेशनशिपबाबत चर्चा सुरु झाली आहे. बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, मीजान बिग बी  यांच्या नातीला म्हणजेच नव्या नवेली नंदा हिला डेट करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये याची चर्चा होताना दिसत आहे. यावर आता मीजानने भाष्य केले आहे.

एका मीडिया पब्लिकेशनला दिलेल्या मुलाखतीत मीजान हसत हसत म्हटला की, “मी आणि नव्या एकाच फ्रेंडसर्कल मधील आहोत. नव्या माझी बहिण (अलवीरा जाफरीची) बेस्ट फ्रेंड आहे. ती माझी ही चांगली मैत्रीण आहे. मी कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नाहीये.” असे मीजान म्हणाला.

View this post on Instagram

How was this look?

A post shared by Navya Naveli Nanda® FC (@naavyananda) on

खरेतर मीजान आणि नव्या यांचा एक फोटो सोशलवर व्हायरल झाला होता. या फोटोत मीजान आणि नव्या एकाच रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसले होते. त्यामुळे या फोटोने दोघांबद्दलच्या बातम्यांनी अजून हवा मिळाली. परंतु आता मीजानने स्पष्ट केले आहे की, तो नव्याला डेट करत नाही. मीजान आणि शरमीन स्टारर मलाल हा सिनेमा 28 जून 2019 रोजी रिलीज होणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like