राष्ट्रवादीकडून ‘जवाब दो’ आंदोलन

लातुर : पोलीसनामा ऑनलाइन – युती शासनाच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली. युवकांच्या हाताला काम नाही. यासाठी आज राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतिने सरकारच्या विरोधात ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले. शहरातील पाच नंबर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत हा  मोर्चा लढण्यात आला.

प्रत्येक वर्षी युवकांना दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा केली. मात्र, आजघडीला परिस्थीती उलट आहे. नोकरीवर असलेल्या युवकांची नोकरी गेली. त्यामुळे शासनाला जबाव विचारण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले. तसेच दुष्काळ जाहीर केला मात्र अद्याप शासनाकडून शेतकऱ्यांना कसलाही फायदा याचा झाला नाही. दुष्काळावर शासन गंभीर नसल्याचा आरोपही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला.

शेतकऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. यावर उपाययोजना करणं गरजेच आहे. लवकरात लवकर शासनाने निर्णय घेऊन यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. तत्काळ उपायोजना करा अन्यथा यानंतर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला.

5 नंबर चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्हाभरातील हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहर जिल्हा अध्यक्ष मकरंद सावे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं.