JNU मध्ये पुन्हा राडा, डावे-ABVP यांच्यात झालेल्या दगडफेकीत अनेक विद्यार्थी जखमी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जवारलाल नेहरु विद्यापीठात पुन्हा एकदा डावे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकमेकांमध्ये भिडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या काही गटाला काही मुखवटा घातलेल्या लोकांनी रॉडने मारहाण केली. जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत जवाहरलाल नेहरु विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा ऐशी घोष यांनी सांगितले. घोष यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत, मुखवटा घातलेल्या गुंडांनी माझ्यावर पाशवी हल्ला केला आहे. मला रक्तस्त्राव होत आहे, मला निर्घृणपणे मारहाण केली गेली.

एबीव्हीपीचे मुखवटा घातलेल्या लोकांनी हल्ला केल्याचा आरोप डाव्या विचारसरणीचे समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. हल्लेखोर अद्याप ओळख पटू शकली नाही. या राड्यावर दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांकडे तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/