Jawan | शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपटानंतर आता ‘जवान’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात ; ‘या’ दिग्दर्शकाने नोंदवली तक्रार

पोलीसनामा ऑनलाईन : सध्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख खान ने त्याच्या वाढदिवसानिमित्त ‘पठाण’ (Pathan) या चित्रपटाचा टिझर आउट केला होता. तर आता शाहरुख खानचे ‘डंकी’ (Dunkey), ‘जवान’ (Jawan) आणि पठाण पकडून तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पठाण चित्रपटाचा टिझर आऊट झाल्यावर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. तर आता ‘जवान’ (Jawan) हा चित्रपट देखील वादाच्या भोवऱ्यात अडकणार असल्याचे दिसत आहे.

शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातील शाहरुखचा फर्स्ट लूकची प्रेक्षकांनी प्रशंसा केली होती. मात्र आता दक्षिणात्य चित्रपट निर्माते माणिकम नारायण (Manickam Narayanan) यांनी जवान या चित्रपटाचे दिग्दर्शक अटली यांच्याविरुद्ध ‘तामिळनाडू फिल्म प्रॉड्युसर्स काउन्सिल’कडे (Tamil Nadu Film Producers Council) तक्रार दाखल केली आहे. तक्रारीचा मुद्दा म्हणजे जवान या चित्रपटाची कथा तामिळ चित्रपट (Tamil Film) ‘पेरारसू’ची (Perarasu) मूळ कथा असल्याचे सांगितले जात आहे. ‘तामिळनाडू फिल्म प्रॉड्युसर्स काउन्सिल’ या प्रकरणाचा 7 नोव्हेंबर नंतर तपास करतील अशी माहिती समोर आली आहे. तर पेरारसू’ या चित्रपटात विजय कांतने (Vijay Kant) पेरारसू’ आणि इलवारसू अशी दुहेरी भूमिका साकारली होती. मात्र जवान चित्रपटात शाहरुखची दुहेरी भूमिका असणार आहे की नाही याबद्दल अटलींनी अद्याप तर स्पष्टीकरण दिले नाही.

जवान (Jawan) हा चित्रपट 2023 च्या जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात शाहरुख खान सोबत दक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासह (Nayantara) अभिनेता विजय सेतुपती
देखील (Vijay Sethupathi) दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर दिग्दर्शक अटली या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bolywood) पदार्पण करणार आहे.

Web Title :-  Jawan | manickam narayanan says jawan story copied from tamil film perarasu

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Danushka Gunathilaka | वर्ल्ड कप खेळलेल्या श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूला बलात्काराच्या आरोपाखाली सिडनीत अटक

Rushabh Shetty | ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीचे बॉलीवूडबद्दल मोठे विधान; म्हणाला…